

Swimming Trip Ends in Tragedy: Young Boy Dies After Drowning in Karad
sakal
कऱ्हाड: सुपने येथे कोयना नदीत आजोबांसमवेत आज पोहण्यासाठी गेलेल्या बारा वर्षांच्या नातवाचा बुडून मृत्यू झाला. वरद शंकर कांबळे (रा. सुपने) असे मुलाचे नाव आहे. तो बुडाल्याची माहिती मिळताच सुपनेचे पोलिस पाटील कमलाकर कोळी व युवकांनी नदीपात्रात उडी मारून त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, त्याला वाचवण्यात यश आले नाही.