

Alcohol-Fueled Clash Turns Fatal in Lonand, Police Register Case
Sakal
लोणंद : देशी दारूच्या दुकानात मद्य प्राशन करत असताना किरकोळ कारणांवरून झालेल्या भांडणात एकास सहा जणांनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्या व पीव्हीसी पाइपने मारहाण केल्याने एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना येथे घडली. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध लोणंद पोलिस ठाण्यात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोंदवण्यात आला असून, लोणंद पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.