

Horrific Accident: Two-Wheeler Rider Dies After Container Runs Over Him
sakal
मलकापूर : कंटेनरने पाठीमागून दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार चिरडून जागीच ठार झाला. येथील सोनाई मंगल कार्यालयासमोर मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर बघ्यांच्या गर्दीमुळे महामार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळित झाली. बापू शंकर भोसले (वय ४५, रा. गोवारे, ता. कऱ्हाड) असे अपघातातील मृताचे नाव आहे.