खंबाटकी घाटातील एस आकाराच्या वळणावर ट्रेलर पलटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

trailer overturned in Kh,bhataki ghat

खंबाटकी घाटातील एस आकाराच्या वळणावर ट्रेलर पलटी

खंडाळा - सातारा -पुणे महामार्गावरील खंबाटकी घाटातील अपघातासाठी प्रसिद्ध असणाऱ्या एस आकाराच्या तीव्र उताराच्या वळणावर कोल्हापूर वरून मुंबईच्या दिशेने जाणारा भरधाव वेगात जाणारा ट्रेलर (गाडी क्रमांक एम एच 46 एच .5159 ) महामार्गावरच पलटी झाला. यामध्ये गाडीचे मोठे नुकसान होऊन या अपघातात चालक व क्लिनर हे दोघे जण जागीच ठार झाले.

याबाबत खंडाळा पोलिसांनी सांगितले की, कोल्हापूर वरून लोखंडी स्टील (सळई) घेऊन खंबाटकी घाटातून मुंबईकडे जात असताना बोगदा संपल्यानंतर तीव्र उताराच्या वळणावर आज सोमवारी सकाळी साडेसात वाजता हा ट्रेलर पलटी झाला. भरधाव वेगात येणारे ट्रेलर घाटातील वळणावर हेलकावे देत कठड्याला जाऊन धडकले. यामध्ये गाडी खाली दबुन दोन जण जागीच ठार झाले तर ट्रेलरचे पुढील भाग असणाऱ्या भागाचे तुकडे झाले.

दरम्यान मृतांची ओळख पटवण्याचे काम खंडाळा पोलीस करत आहे. महामार्गावरील फलकाच्या कठड्यावर हे ट्रेलर पडल्याने मुख्य वाहतुकीला या अपघाताचा अडथळा ठरला नाही. घटनेचे गांभीर्य पाहता पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश इंगळे, पोलीस उपनिरीक्षक पांगारे, पोलीस हवालदार धुमाळ, मोरे, वाहतूक पोलीस फरांदे व कुंभार, पोलीस नाईक प्रशांत धुमाळ व जगदाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. मृताचे शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी मदमार्गावरील इतर गाड्या यांचा सुदैवाने बचाव झाला.

Web Title: Trailer Overturns At S Shaped Turn In Khambhatki Ghat Two Died On The Spot

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top