esakal | कोरोनातही 8000 युवकांना 'कौशल्य' प्रशिक्षण; आयटी क्षेत्राकडे सर्वाधिक कल
sakal

बोलून बातमी शोधा

Training IT

कोरोनातही 8000 युवकांना 'कौशल्य' प्रशिक्षण; आयटी क्षेत्राकडे सर्वाधिक कल

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : कमी झालेला कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागल्यामुळे सर्वत्र पुन्हा एकदा लॉकडाउन करण्यात आले आहे. या लॉकडाउनच्या काळातही कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत विविध प्रशिक्षणाचा लाभ घेता येणार आहे. आतापर्यंत आठ हजार युवक, युवतींनी हे प्रशिक्षण पूर्ण केले असून, सध्या 700 जण विविध संस्थांत प्रशिक्षण घेत आहेत. जिल्ह्यातील युवकांचा कल आयटी क्षेत्राकडे सर्वाधिक आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना प्रमाणपत्रासोबतच रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

कोरोनाचा संसर्ग गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. आता पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक जिल्ह्यात झालेला आहे. अशा परिस्थितीत रोजगार व स्वयंरोजगाराला महत्त्व प्राप्त झाले आहे. कौशल्य विकासाच्या माध्यमातून जिल्ह्यातील हजारो युवकांनी प्रशिक्षण घेऊन स्वयंरोजगाराची साथ धरली आहे. आता कोरोनाचा संसर्ग वाढल्याने पुन्हा एकदा मिनी लॉकडाउन करण्यात आले आहे. तरीही कौशल्य विकास संस्था व आयटीआयच्या माध्यमातून कौशल्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. यामध्ये 15 ते 45 वयोगटातील दहावी ते पदवीधरांपर्यंतच्या उमेदवारांना प्रशिक्षण घेता येते. त्यासाठी कृषी, ऍपरल, इलेक्‍ट्रॉनिक्‍स आणि हार्डवेअर, ब्युटी आणि वेलनेस, ऍटोमोटिव्ह, लॉजिस्टिक, आयटी आणि आयटी क्षेत्राशी संलग्न, इलेक्‍ट्रिकल्स, प्रॉडक्‍शन आणि मॅन्युफॅक्‍चरिंग, हॉस्पिटीलिटी, फॅब्रिकेशन, वेल्डिंग, प्लंबिंग, बॅंकिंग आणि अकाउंटिंग, सीएनसी मशिन, गवंडीकाम, रबर अशा विविध क्षेत्राशी निगडित जॉबरोलचे प्रशिक्षण दिले जाते.

Maharashtra Lockdown : गड्या आपला गावच लई बरा!

यामध्ये उमेदवारांच्या पसंतीनुसार त्याला प्रशिक्षण निवडता येते. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्रासोबतच रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी देखील प्राप्त होणार आहेत. त्यासाठी आता कोरोनाच्या काळात घरबसल्या ऑनलाइन प्रशिक्षण घेता येणार आहे. लॉकडाउनची परिस्थिती निवळल्यानंतर प्रॉक्‍टिकल पूर्ण करता येणार आहे. सातारा जिल्ह्यातील आठ हजार युवक, युवतींनी आतापर्यंत हे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. सध्या 700 युवक विविध संस्थांत प्रशिक्षण घेत आहेत. यामध्ये सर्वाधिक पसंती आयटी आणि आयटी क्षेत्राशी संलग्न प्रशिक्षणांना आहे. तसेच प्रॉडक्‍शन आणि मॅन्युफॅक्‍चरिंग, हॉस्पिटीलिटी, ब्युटी व वेलनेस यालाही युवतींकडून पसंती दिली जात आहे.

शाब्बास! ओडिशात कऱ्हाडच्या 'आयर्न मॅन'ची झक्कास कामगिरी

युवकांनी कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून विविध प्रशिक्षणे घेऊन स्वयंरोजगार व रोजगाराची कास धरावी. जिल्ह्यात सध्या युवक व युवतींकडून आयटी व आयटीशी संलग्न प्रशिक्षणांना पसंती दिली जात आहे.

-सचिन जाधव, सहायक आयुक्त, कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता, सातारा

Edited By : Balkrishna Madhale

loading image
go to top