esakal | सातारा : तीन नायब तहसीलदारांच्या बदल्या
sakal

बोलून बातमी शोधा

सातारा : तीन नायब तहसीलदारांच्या बदल्या

शासनाने संबंधित अधिकाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी तत्काळ रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांना शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय कोणत्याही कारणास्तव रजा मंजूर करू नये तसेच महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम १९८१ मधील नियम ३० नुसार मूळ कार्यालयाने बदली झालेल्या अधिकाऱ्यांचे कोणत्याही प्रकारचे रजेचे अर्ज स्वीकारू नयेत, असे अर्ज प्राप्त झाल्यास ते संबंधित अधिकाऱ्यांना मूळ पत्त्यावर नोंदणी पोच डाकने परत करावेत.

सातारा : तीन नायब तहसीलदारांच्या बदल्या

sakal_logo
By
प्रशांत घाडगे

सातारा : सातारा जिल्ह्यातील नायब तहसीलदार यांच्या बदलीचे आदेश नुकतेच शासनाच्या वतीने काढण्यात आले आहेत. यामध्ये जिल्ह्यातील तीन नायब तहसीलदारांची बदली करण्यात आली असून, संबंधित अधिकाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी तत्काळ रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
 
बदली झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये संतोष सोनवणे निवडणूक शाखा वाई यांची निवडणूक शाखा नायब तहसीलदार मावळ (पुणे), अंकुश हिवरे नायब तहसीलदार संजय गांधी योजना माण तालुका यांची निवडणूक शाखा नायब तहसीलदार फलटण याठिकाणी, तर अनिल ठोंबरे महसूल विभाग फलटण तालुका यांची निवासी नायब तहसीलदार इंदापूर (पुणे) याठिकाणी बदली झालेली आहे.

लडाखाच्या दरीत जवानाचा मृत्यू; परळी खाे-यात हळहळ 

शासनाने संबंधित अधिकाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी तत्काळ रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांना शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय कोणत्याही कारणास्तव रजा मंजूर करू नये तसेच महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम १९८१ मधील नियम ३० नुसार मूळ कार्यालयाने बदली झालेल्या अधिकाऱ्यांचे कोणत्याही प्रकारचे रजेचे अर्ज स्वीकारू नयेत, असे अर्ज प्राप्त झाल्यास ते संबंधित अधिकाऱ्यांना मूळ पत्त्यावर नोंदणी पोच डाकने परत करावेत.

Edited By : Siddharth Latkar

loading image