

Transgender community members interacting with students and citizens during a sexual awareness program in Karad.
Sakal
-सचिन शिंदे
कऱ्हाड : तृतीय पंथीय किंवा ट्रान्सजेंडर यांच्या संदर्भात असलेले समज अन् गैरसमज दुर व्हावेत यासाठी कऱ्हाड शहरात आज तीन वेगवेगळ्या ठिकाणी संवाद कार्यशाळा झाली. अमित एक्झिकेटिव्ह, हाॅटेल संगम व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मुंबईच्या हमसफर ट्रस्ट आणि सातारा येथील पेहचान फौंडेशनने विद्यार्थ्यांसह सामान्य नागरीकांशी संवाद साधला. लैंगिक संवेदनशीलतेवर पहिल्यांदाच कऱ्हाडला तीन वेगवेवगळ्या ठिकाणी झालेल्या कार्यशाळांना चांगला प्रतिसाद मिळाला.