Satara Fraud:'सहलीच्या नावाखाली १५ लाखांची फसवणूक'; सहा जणांवर गुन्हा, ३६ जणांकडून घेतले होते पैसे
Fake Tour Package Dupes 36 People of ₹15 Lakh : दुबई या ठिकाणी कंपनीची सहल जाणार आहे, असे सांगून वारगडे यांच्याकडून बुकिंगसाठी पैसे घेतले. अशाप्रकारे संशयितांनी ३६ जणांकडून १५ लाख ३६ हजार ९५० रुपये घेतले होते; परंतु त्यांनी त्यांना सहलीला नेले नाही, तसेच सहलीसाठी घेतलेले पैसेही परत केले नाहीत.
सातारा : उत्तर आणि दक्षिण भारत, तसेच दुबईत सहलीला जाण्यासाठी बुकिंगसाठी पैसे घेऊन १५ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी सहा जणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.