Satara News : वृक्षांची कत्तल झाली, पर्यायी वृक्षलागवड कधी? सातारा जिल्ह्यात महामार्ग बोडकेच

पुणे- बंगळुरू महामार्गाच्या जिल्ह्यात ६७ किलोमीटरच्या रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम अद्यापही सुरू आहे.
Satara News
Satara News sakal

कऱ्हाड : पुणे- बंगळूरसह जिल्ह्यातील अन्य महामार्गाच्या रूंदीकरणावेळी तब्बल नऊ हजार वृक्षांची कत्तल करावी लागली आहे. मात्र त्यापेकी एकास पाच प्रमाणे ४५ हजार वृक्ष लावण्याची सक्ती असतानाही महामार्गसहीत संबधित विभागाने त्याला नकारघंटाच दिला आहे. वन विभागानेही नकार कळविल्याने राष्ट्रीय महामार्गच्या वृक्ष लावण्याच्या मर्यादा स्पष्ट जाल्या त्यामुळे पुणे-बंगळुरू महामार्गासहीत पंढरपूर, विटा, तासगाव महामार्गावरही वृक्षच लावण्यात आलेली नाहीत.

Satara News
Nashik News : नाशिक ते माळेगाव एमआयडीसी दरम्यान बस सेवा सुरु

किमान धोरण जाहीर करा

पुणे- बंगळुरू महामार्गाच्या जिल्ह्यात ६७ किलोमीटरच्या रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम अद्यापही सुरू आहे. ते ५० टक्के पूर्ण झाले आहे. त्यासाठी त्या मार्गावरील तब्बल सहा हजार वृक्ष तोडण्यात आले आहेत. त्या रस्त्याचे ७० टक्के काम पूर्ण झाल्यानंतर संबधीत विभाग किंवा ठेकेदार वृक्ष लावण्याबाबतची निर्णय घेईल, असे महामार्ग विभाग सांगत आहे, मात्र रस्त्याचे काम ५० टक्के काम होत आले आहे, त्यामुळे वृक्ष लावण्याचे धोरण तरी किमान जाहीर करण्याची गरज आहे. ते करावे, यासाठी पर्यावरण प्रेमी झटत आहेत.

Satara News
Jalgaon Crime News : मोहाडी दगडफेक प्रकरण; सरपंचाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

केवळ टोलवा टोलवीच..

रस्त्याच्या कामासाठी पाडलेल्या वृक्षांच्या बदल्यात पाचपट वृक्ष लावण्याची सक्ती कंत्राटदारासहीत संबधित शासकीय विभागास शासनाने केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात वेगवेगळ्या रस्यांसाठी पाडलेल्या प्रत्यक्षात नऊ हजार वृक्षांच्या बदल्यात ४५ हजार वृक्ष प्रत्येक रस्त्याच्या कडेला लागणे अपेक्षीत आहे. तर महामार्गाच्या सहा पदरीकरणासाठी पाच हजार वृक्ष पाडले आहेत, तियांनी किमान २५ हजार वृक्ष लावण्याचे काम हाती घेण्याची गरज आहे, मात्र घेताना ८० टक्क्यांचे काम झालेला निर्णयाकडे ते निर्देश करून टोलवा टोलवी करत आहेत.

Satara News
MSEB News : 24 तास ‘ऊर्जा चॅट बॉट’ ग्राहकांच्या सेवेसाठी उपलब्ध

दोन वर्षे लोटली तरीही...

पंढरपूर, तासगाव, विटा या महामार्गाचे काम होवून दोन वर्षे लोटली आहेत. ते रस्ते खुले केले आहेत. मात्र तेथे एकही वृक्ष लावलेले नाही. त्याचा जाब विचारणाऱ्यावर दबाव आणला जातो. त्यामुळे शासनानेच यात पुढाकार घेवून त्या ठेकेदार किंवा संबधीत काम घेणाऱ्याला सक्ती करण्याची गरज आहे. त्या भागातील तब्बल तीन हजार वृक्ष तोडण्यात आली आहेत. त्या बदल्यात किमान १५ हजार वृक्ष लावण्याची सक्ती गरजेची आहे. त्यासाठी प्रयत्न होणे अपेक्षीत आहे. काम होवून दोन वर्षे लोटली तरिही काहीही झालेले नसल्याने लोकांत संताप आहे.

Satara News
Nashik News : देव तारी त्याला कोण मारी! तिसऱ्या मजल्यावरून पडलेला चिमुरडा सुदैवाने बचावला

नव्या, जुन्या वृक्षांवरही कुऱ्हाड

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या शेंद्रे ते कागल, पंढरपूर, तासगाव, विटा असा रस्त्यावरील अनेक जुन्या वृक्षांची कत्तल झाली आहे. त्यामुळे ती वृक्ष लावण्याची गरज आहे. राष्ट्रीय महामर्गाच्या १५० किलोमीटर पट्ट्याच्या सहापदरीकरणाच्या कामाला गतीने सुरुवात झाली. त्यात शेंद्रे ते पेठनाका ६७ किलोमीटर पट्ट्यात नवीन पुलासहीत महामार्गाच्या कामामुळे रस्त्याच्या बाजूची पाच हजार वृक्ष तोडावी लागली आहेत. त्यात अत्यंत जुन्या व नव्याने लावलेल्या वृक्षांचाही समावेश आहे. त्यात १०० वर्षे वय असलेल्या एक हजार, तर ५० वर्षे वय असलेल्या दोन हजार वृक्षांचा त्यात समावेश आहे. अलीकडच्या पाच वर्षांतील वृक्षही त्यात जमीनदोस्त झाले आहेत.

कंत्राटदारवर सक्ती गरजेची

रस्त्याच्या कामात वृक्षतोड करणे अनिवार्य असले, तरी एका वृक्षतोडीमागे पाच वृक्षांची लागवड व संगोपनही महत्वाचे आहे. त्यात वृक्षांच्या लागवडीसह त्यांच्या संगोपनाविषयी ठेकेदारांना सक्ती करण्याची गरज आहे. त्यासाठी एनव्हायरोतर्फे निवेदन दिले आहे. वृक्षतोड करताना एका वृक्षमागे पाच वृक्षांची लागवड व संगोपन बंधनकारक आहे. त्या वृक्षांची लागवड कधी करणार, कोणत्या प्रकारचे वृक्ष असणार, वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन, संगोपन, त्यांची जागा, वय, प्रजाती त्याची माहिती क्लबच्या सदस्यांनी घेतली आहे. त्यावरही सविस्तर चर्चा झाली आहे. यावेळी एनव्हायरोचे अध्यक्ष जालिंदर काशीद यांनी भूमिका स्पष्ट करत तोडलेल्या वृक्षांच्या बदल्यात पर्यायी पाच वृक्षांची लागवड करणार असल्याचे कंत्राटदार कंपनीने स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com