esakal | काळजी करु नका;गिर्याराेहक प्रियांकाने घेतला महत्वपुर्ण निर्णय

बोलून बातमी शोधा

Priyanka Mohite
काळजी करु नका;गिर्याराेहक प्रियांकाने घेतला महत्वपुर्ण निर्णय
sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा : अन्नपुर्णा (Annapurna Mountain) माेहिम फत्ते केल्यानंतर गिर्याराेहक प्रियांका माेहितेने (Priyanka Mohite) माऊंट धौलागिरी (Dhaulagiri) या सातव्या अत्युच्च शिखरावर चढाई करण्याचा निर्धार केला हाेता. त्यामुळे आगामी 20 ते 25 दिवसांत महाराष्ट्रातील गिर्याराेहकांना आणखी एक आनंदाची बातमी मिळणार हाेती.

दरम्यान प्रियांकाने आज (गुरुवारी) समाज माध्यमातून आपण धौलागिरी माेहिम तात्पूरत्या स्वरुपात स्थगित केल्याची माहिती दिली आहे. देशातील विशेषतः महाराष्ट्रातील गिर्याराेहकांना अभिमान वाटावा अशी घटना शुक्रवारी (ता.१६ एप्रिल) घडलेली आहे. लहान वयात विविध शिखरांवर चढाई करणा-या साता-याच्या प्रियांका मंगेश मोहिते (Priyanka Mangesh Mohite) हिने अन्नपूर्णा पर्वतावर (Annapurna Mountain) नुकतीच यशस्वी चढाई केली आहे. प्रियांकाची अन्नपुर्णावरीलपरिक्रमा महिला गिर्याराेहकांच्या दृष्टीतून हा एक नवा इतिहास ठरल्याचा दावा तिच्या कुटुंबियांकडून करण्यात आला आहे.

हेही वाचा: अभिमानास्पद! शिवरायांच्या भुमीतील 'प्रियांका'ची दमदार कामगिरी

दरम्यान अन्नपुर्ण माेहिमेनंतर माऊंट धौलागिरी सुमारे आठ हजार 167 मीटर (26 हजार 795 फूट) या शिखराच्या माेहिमेचे नियाेजन प्रियांकाने केले हाेते. त्याची तयारी देखील केली हाेती. परंतु आता प्रियांकाने स्वतःच या माेहिमेस सध्या तरी जाणार नसल्याचे सांगितले आहे. प्रियांका म्हणते, सर्वांना नमस्कार, 2 डिग्री फ्रॉस्टबाइटमुळे (हिमबाधा) मी एक पाऊल मागे घेत आहे आणि माउंट धौलागिरी अभियान पुढे ढकलत आहे. याबराेबरच प्रियांकाने चाहत्यांना काळजी करु नये, मी ठीक आहे. पुढील आरोग्यास होणारे नुकसान टाळण्यासाठी आता सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याने निर्णय घेतल्याचे तिने नमूद केले.

नागरिकांनो, थोडंतरी जबाबदारीचं भान ठेवा; सभापती रामराजेंचं आवाहन