अभिमानास्पद! शिवरायांच्या भुमीतील 'प्रियांका'ची दमदार कामगिरी

हा पर्वत जगभरातील सर्वात उंच पर्वतांमध्ये १०व्या क्रमांकावर येतो. मात्र हा पर्वत चढण्यासाठी जगातील सर्वाधिक अवघड समजला जातो.
Priyanka Mohite
Priyanka MohiteFacebook

सातारा : देशातील विशेषतः महाराष्ट्राती गिर्याराेहकांना अभिमान वाटावा अशी घटना शुक्रवारी घडलेली आहे. लहान वयात विविध शिखरांवर चढाई करणा-या साता-याच्या प्रियांका मंगेश मोहिते (Priyanka Mohite) हिने अन्नपूर्णा पर्वतावर (Annapurna Mountain) यशस्वी चढाई केली आहे. प्रियांकाची अन्नपुर्णावरील परिक्रमा महिला गिर्याराेहकांच्या दृष्टीतून हा एक नवा इतिहास ठरल्याचा दावा तिच्या कुटुंबियांकडून करण्यात आला आहे. शुक्रवारी (ता.१६ एप्रिल) प्रियांका अन्नपुर्णाच्या शिखरील टोकावर पोहचली. या शिखरावर यशस्वी चढाई करणारी पहिली भारतीय महिला गिर्यारोहक म्हणून तिची पुन्हा एका नव्याने आेळख निर्माण झाली आहे.

महाराष्ट्राची कन्या असलेल्या प्रियांका मोहिते हिने अवघ्या २१व्या वर्षी माऊंट एव्हरेस्टवर यशस्वीरित्या चढाई केली होती. सर्वाधिक कमी वयात हा पर्वत चढणारी प्रियांका ही तिसरी भारतीय महिला ठरली होती. नेपाळ येथील हा अन्नपूर्णा पर्वत चढाई करण्यात खूप अवघड समजला जातो. अनेक गिर्यारोहकांची दमछाक होत असते. याची उंची सुमारे आठ हजार ९१ मीटर इतकी आहे. याआधी सहा भारतीयांनी हे शिखर यशस्वी चढले आहे. एक महिला गिर्यारोहक म्हणून प्रियांका हिचा नावलौकिक झाला आहे. प्रियांकाने हा पर्वत कसोशीने चढाई करून देशाचा गौरव केला आहे.

हा पर्वत जगभरातील सर्वात उंच पर्वतांमध्ये १०व्या क्रमांकावर येतो. मात्र हा पर्वत चढण्यासाठी जगातील सर्वाधिक अवघड समजला जातो. त्यामुळेच हा पर्वत चढताना आतापर्यंत ४० गिर्यारोहकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, यावरून याचा प्रत्यय येतो असे गिर्याराेहक नेहमी म्हणतात.

दरम्यान प्रियांकावर साेशल मीडियातून अभिनंदनाचा वर्षाव हाेत आहे. या माेहिमेसाठी प्रियांकाला सहकार्य करणारे आनंद शिंदे (Anand Shinde) यांनी तिचे अभिनंदन केले आहे. त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून तिचे अभिनंदन करताना महाराष्ट्रातील अऩ्य गिर्याराेहकांचेही काैतुक केले आहे. ते लिहितात आजचा दिवस केवळ महाराष्ट्राच्याच नाही तर भारतीय गिर्यारोहणाकरीता देखील अत्यंत भाग्याचा ठरला. दुपारी बारानंतर धडाधड एकापाठोपाठ आणि एकापेक्षा एक थरारक आणि सुखद बातम्यांचा जणू ओघच सुरु झाला. नेपाळच्या उत्तुंग पर्वतरांगांमध्ये पहुडलेल्या, जगातील १०व्या क्रमांकाच्या अत्त्युच्च अशा माऊंट अन्नपुर्णा (८,०९१ मीटर/२६,५४५ फुट) हिमशिखरावर मागील अनेक दिवसांपासून एक अद्वितीय आणि थरारपुर्ण चढाई संग्राम सुरु होता.

Video पाहा : विनाकारण फिरताय मग कोविड टेस्ट करा!

गुरुवारी मध्यरात्रीपासून तर जगभरातील नामवंत गिर्यारोहक आपली दुर्दम्य इच्छाशक्ती, असिम आरोहण कौशल्ये आणि गिर्यारोहणातील विविध शस्त्रास्त्रे परजूनच या लढ्याच्या अंतिम चरणात मोठ्या त्वेषाने झुंजू लागले होते. भयंकररीत्या खालावलेले तपमान, आरोहकांचा घास घेण्यासाठी आसुसलेल्या अक्राळविक्राळ छुप्या हिमद-यांचे भय, कधीही अंगावर येणारे. श्वास दडपून टाकणारे हिमकडे तर ॲव्हलांचमधून येणारे विशाल हिमप्रपात काळजाचा थरकाप उडवत होते. अशा भयकारी परिस्थितीतही हवामानाचा कल पाहूनच गिर्यारोहकांचे ताफे इंच इंच लढवू म्हणत अगदी संथ गतीने यशाच्या दिशेने अग्रेसर होत होते. काळरात्र संपताच जसजसे दशदिशांतून प्रातःकालीन नवतेजाचा उदय होऊ लागला तसे माता अन्नपुर्णा देवीच्या नांवावरून ओळखले जाणारे माऊंट अन्नपुर्णा हे जगद्विख्यात हिमशिखर या समस्त लढवैय्यांवर मेहेरबान होऊ लागले.

जणू महाराष्ट्राची भाग्यभवानी या साहसवीरांवर अन्नपुर्णेच्याच रुपाने प्रसन्न झाली. पहाटेपासूनच वा-याचा जोर कमी होऊन उत्तम हवामानाची साथ मिळू लागल्याने अन्नपुर्णाचा शिखरमाथा गिर्यारोहकांच्या पथकांनी गजबजू लागला. मात्र काहीही खात्रीची खबर येत नसल्याने इकडे महाराष्ट्रातील लाखो हृदये कमालीची धडधडू लागली होती. अनेकांच्या घरी तर देव पाण्यात बसले होते. समस्त देवीदेवतांना नवस बोलले जाऊ लागले होते. श्रद्धा अखंड होती, अभंग होती. तरीदेखील आशंकांचे मळभ मात्र सतत दाटून येतच होते. अशातच अचानक आलेल्या एका जबरदस्त खुषखबरीने आसमंत दुमदुमला. हिमालयाबरोबरच सखासह्याद्री देखील सुखावून गेला. भारावून गेला. महाराष्ट्राची जिगरबाज शिखरकन्या प्रियांका मोहिते आणि भगवान चवले यांनी माऊंट अन्नपुर्णाचा शिखरमाथा दिमाखात सर केल्याची खबर येऊन पोहोचली.

तरीदेखील चिंतेचे वातावरण अद्याप कायम होते. कारण अजून एक अपेक्षित बातमी अद्याप आली नव्हती. आणि तासाभरातच सकाळपासून यशासमीप असलेल्या पुण्याच्या गिरीप्रेमी संस्थेचे भुषण हर्षे, सुमित मांदळे आणि जितेंद्र गवारे यांनी देखील अन्नपुर्णाचा शिखरमाथा जोशातच सर केल्याची खुषखबर देखील येऊन ठेपली. आजचा दिवस केवळ महाराष्ट्राच्याच नाही तर भारताच्याही गिर्यारोहण इतिहासात एक अत्यंत महत्वाचा दिवस म्हणून कायमचा नोंद झाला.

नाईकबाच्या डोंगराला पोलिसांचा वेढा; ढेबेवाडीत आठ ठिकाणी नाकाबंदी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com