

Political Storm in Wai After Abduction Case Names Local BJP Office Bearer
sakal
सातारा : बावधन (ता. वाई) परिसरात एका हळद पॉलिश करणाऱ्या व्यावसायिकाला शेतातून उचलून नेऊन घरात डांबून बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मनोज हरिश्चंद्र नायकवडी (वय ४०, रा. बावधन) यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाई पोलिसांनी भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक दिलीप ननावरे, प्रसाद दत्तू ननावरे आणि अक्षय राजेंद्र ननावरे यांच्यासह एका अनोळखी दुचाकी चालकावर गुन्हा दाखल केला आहे.