जनतेची काळजी घेणाऱ्या वैद्यकीय विभागाला बसला धक्का

जनतेची काळजी घेणाऱ्या वैद्यकीय विभागाला बसला धक्का
Updated on

दहिवडी (जि. सातारा) : कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊनही माण तालुक्‍यातील वैद्यकीय अधिकारी पॉझिटिव्ह आल्याने खळबळ माजली आहे. यासोबतच अजून दोन वैद्यकीय अधिकारी, आशा, अंगणवाडी सेविका पॉझिटिव्ह आले आहेत. सद्यःस्थिती पाहता कंटेनमेंट झोन कायम ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. शहरातील व्यवहार कधी सुरू करायचे याचा निर्णय अजून अधांतरी आहे.
 
शहर हॉटस्पॉट झाल्यानंतर शासनाने संपूर्ण शहरच कंटेनमेंट झोन घोषित करून उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली. मात्र, विविध उपाययोजना राबवूनही कोरोनाबाधितांची संख्या आटोक्‍यात आणण्यात प्रशासन यशस्वी होताना दिसत नाही. बाधितांची साखळी तुटत नाही. उलट दिवसेंदिवस बाधितांची संख्या वाढतच चालली आहे. शहरात सोमवारी 40 बाधित सापडले होते. दिलासादायक बाब म्हणजे त्यानंतर मंगळवारी 15, बुधवारी 9, तर गुरुवारी 2 अशी बाधितांची संख्या घटत गेली आहे. 
मात्र, या पार्श्‍वभूमीवर सर्व जनतेची काळजी घेणाऱ्या वैद्यकीय विभागालाच कोरोनाने हादरा दिला. एका वेळी तीन वैद्यकीय अधिकारी बाधित आढळले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यातील एका वैद्यकीय अधिकाऱ्याने कोविड लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. पहिला डोस दीड महिन्यांपूर्वी, तर दुसरा डोस घेऊन साधारण दहा ते 11 दिवस झाले आहेत. या प्रकारामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर घातली असली, तरी पुन्हा एकदा कोरोनावर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.
 
या परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने बैठक घेतली. प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी, तहसीलदार बाई माने, सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ, नगराध्यक्ष धनाजी जाधव, मुख्याधिकारी अवधूत कुंभार व वैद्यकीय अधिकारी या वेळी उपस्थित होते. आज (शुक्रवार) संपूर्ण शहरातील नागरिकांचा वन डे सर्व्हे करण्यात येणार आहे. यात 13 वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा सेविका व इतर कर्मचारी सहभागी होणार आहेत. 

"नागरिकांनी घाबरून जाऊ नये. प्रशासनाला सहकार्य करावे. प्रशासन तुमच्या सेवेसाठी तत्पर आहे. नगरपंचायतीकडून सर्व्हे करण्यासोबतच प्रतिकारशक्ती वाढविणारी औषधे नागरिकांना पुरविण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. परिस्थिती पाहून कंटेनमेंट झोन उठविण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. तोपर्यंत नागरिकांनी धीर धरावा.' 

शैलेश सूर्यवंशी, प्रांताधिकारी. 

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Satara Highway weekend traffic
Greater Flamingo sighting
Koyna Dam reservoir live storage report July 2026
Koyana Dam Water Release
Marathi News Esakal
www.esakal.com