
आनेवाडी / दहिवडी : जिल्ह्यात उष्णतेची दाहकता वाढली असून, जावळी तालुक्यातील आर्डे येथील शेतकरी शेतात काम करताना उन्हाचा त्रास झाल्याने राजकुमार मारुती ससाणे (वय ५८) यांचा मृत्यू झाला. माण तालुक्यातील भांडवलीतील ज्योतिराम निवृत्ती शिंदे (वय ७८, रा. तेलदरा) यांचाही उष्माघाताने मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, जिल्ह्यात उन्हाच्या चटक्यांमुळे सारेच त्रस्त झाले आहेत.