

Jakhinwadi murder case: Three accused remanded to police custody, two minors sent to juvenile home after court order.
Sakal
कऱ्हाड : जखिणवाडी (ता. कऱ्हाड) येथील प्रवीण सुभाष बोडरे याच्या खूनप्रकरणी शहर पोलिसांनी तीन संशयित हल्लेखोरांना अटक केली असून, दोन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेतले आहे. अविनाश अशोक येडगे, देवेंद्र अशोक येडगे आणि संकेत संजय मिठारे (तिघेही रा. जखिणवाडी, ता. कऱ्हाड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. संबंधित संशयितांना येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली. दरम्यान, दोघा अल्पवयीन संशयितांना बालसुधारगृहात पाठवले आहे.