esakal | संशयितांचा पाठलाग करून दोन पिस्तूल जप्त; सातारा एलसीबीची कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai crime

संशयितांचा पाठलाग करून दोन पिस्तूल जप्त; सातारा एलसीबीची कारवाई

sakal_logo
By
(शब्दाकंन - सचिन शिंदे)

कऱ्हाड : पोलिसांच्या रेकॉर्डवरील व हद्दपार केलेल्या दोन संशयीतांचा पाठलाग करून पोलिसांनी शिरवडे फाट्यावर त्यांना अटक केली. दोघांची झडती घेतल्यानंतर त्यांच्याकडून सातारा एलसीबीच्या पथकाने एक लाख ५० हजारांच्या दोन देशी बनावटीच्या दोन पिस्टल जप्त केल्या. अमित हणमंत कदम (वय २३ वर्षे रा. अंतवडी) व अल्तमेश उर्फ मोन्या हरुण तांबोळी (२१ रा. मंगळवार पेठ, पालकरवाडा) अशी त्यांची नेव आहेत. त्यातील मोन्या पोलिस रेकॉर्डवरील संशयीत आहे.

एलसीबीचे पथक शिरवडे परिसरात गस्त घालत होते. त्यांना पाहून मोन्यासहीत अमीतही पळून निघाले होते. त्यावेळी पथकाने त्याचा पाठलाग करून दोघांना पकडले. त्यांची झडती घेतली असता दोघांकडे दोन वेगवेगळी दोन देशी बनावटीच्या गावठी पिस्तल जप्त झाली आहेत. त्याची एक लाख ५० हजार इतकी किंमत आहे. एलसबीचे मोहसीन मोमीन व त्यांच्या सहकाऱ्यांना कबर्यांकडून माहिती मिळाली होती. त्यानुसार हद्दपार संशयीतांवर त्यांचे लक्ष होते. त्यानुसार तालुक्यात एलसीबीच्या पथकाने आज पट्रोलींग असल्याने सापळा रचला होता. त्यानुसार कारवाई झाली. शिरवडेच्या हद्दीत पेट्रोलींग करताना दुपारी दोनच्या सुमारास शहापूर फाटा ते तासवडे टोलनाका रस्त्यावर रेल्वे फाटकाचे जवळ वरील दोघेही संशयीत फिरताना त्यांना आढळली.

हद्दपार असलेला संशयीत अमित कदम व पोलीस रेकॉर्डवरील संशयीत मोन्या तांबोळी असल्याचे खात्री पोलिसांची झाली. त्यांनी हटकताच दोघेही तेथून पळूनजाण्याच्या तयार असतानाच त्यांना पकडण्यात आले. दोघांची झडती घेतली असता त्या दोघांकडे प्रत्येकी एक अशा दोन देशी बनावटीच्या गावठी एक लाख ५० हजारांच्या दोन पिस्तल जप्त जाल्या आहेत. तळबीड पोलीसात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

​एलसीबीचे पोलिस निरिक्षक किशोर धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरिक्षत रमेश गर्जे, आनंदसिंग साबळे, गणेश वाघ, सहायक फौजदार उत्तम दबडे, हवालदरा अतिष घाडगे, संतोष पवार, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, नितीन गोगावले, साबीर मुल्ला, प्रविण फडतरे, मंगेश महाडीक, निलेश काटकर, मुनीर मुल्ला, गणेश कापरे, अमित सपकाळ, प्रमोद सावंत, प्रविण कांबळे मयूर देशमुख, मोहसीन मोमीन, प्रविण पवार, विशाल पवार, रोहित निकम,सचिन ससाणे, केतन शिंदे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

loading image
go to top