घरकुलच्या ‘पाटण पॅटर्न’ला पुरस्कार! तीन वर्षांत अडीच हजारांवर घरकुले

Gharkul scheme
Gharkul scheme
Summary

घरकुल बांधकामाच्या ‘पाटण पॅटर्न’ने जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा मिळवून दिला आहे.

पाटण (सातारा): प्रधानमंत्री आवास योजना, रमाई व शबरी घरकुल योजनेच्या माध्यमातून तीन वर्षांत पाटण तालुक्यातील दोन हजार ६३४ कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ दिला आहे. या कामाची दखल घेऊन शासनाने पाटण तालुक्याला विभागस्तरीय चार व जिल्ह्याला एक असे एकूण पाच पुरस्कार जाहीर केले आहेत. घरकुल बांधकामाच्या ‘पाटण पॅटर्न’ने जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा मिळवून दिला आहे.

Gharkul scheme
पाटण तालुक्यातील 49 गावात अजूनही भय इथे संपत नसल्याचे वातावरण

महाआवास अभियान अंतर्गत पुणे विभागस्तरीय सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार, प्रधानमंत्री आवास योजना सर्वोत्कृष्ट तालुका द्वितीय क्रमांक, रमाई आवास योजना सर्वोत्कृष्ट तालुका तृतीय आणि भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्धतेचा सर्वोत्कृष्ट तालुका द्वितीय पुरस्कार असे एकूण चार पुरस्कार पाटण पंचायत समितीला व या कामकाजावर सातारा जिल्ह्याला सर्वोत्कृष्ट जिल्हा म्हणून द्वितीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सन २०१७ ते २०२० या कालावधीत प्रधानमंत्री आवास योजनेची एक हजार ५८०, रमाई योजनेची पाच आणि एक हजार १७६ अशी एकूण दोन हजार ६३४ घरांची उभारणी केली.

Gharkul scheme
पाटण तालुक्यातील 10 गावे धोकादायकच! भूगर्भ तज्ञांची पाहणी...

त्यामध्ये कोयना विभागातील नाव ग्रामपंचायतीने ७० घरकुले, शिरळ- ९५ व जिंती- ९६ घरकुले पूर्ण करून या योजनेस हातभार लावला. ही मोहीम राबविण्यासाठी सभापती राजाभाऊ शेलार, उपसभापती प्रतापराव देसाई, सर्व सदस्य, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, विस्तार अधिकारी, ‘नरेगा’ची टीम, स्वच्छ भारत मिशन विभाग यांनी मोलाचे सहकार्य केले. प्रत्यक्ष अंमलबजावणीत विस्तार अधिकारी (सांख्यिकी) सागर बोलके, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता जगदीश पाटणकर, प्रतीक पाटील, डेटा एन्ट्री ऑपरेटर सोनाली वीर- मोहिते यांनी लाभार्थी, ग्रामसेवकांना सहकार्य केले.

Gharkul scheme
सौंदर्यखणी : भारतीय अभिजात कला ‘पाटण पटोला’

कोरोना, लॉकडाऊन आणि बांधकाम साहित्यांचे दर वाढले असतानाही घरकुल योजना राबविण्यासाठी पंचायत समितीचे पदाधिकारी, सरपंच, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामामुळे ही मोहीम यशस्वी झाली.

- मीना साळुंखे, गटविकास अधिकारी, पाटण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com