कऱ्हाडात सोनसाखळी, दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड; दिवाळीच्या पूर्व संध्येला 13 गुन्हे उघडकीस

सचिन शिंदे
Friday, 13 November 2020

महिन्यापूर्वी शहर हद्दीतून चार, उंब्रज येथून दोन व कोळसेवाडी (जि. ठाणे) येथून दुचाकी चोरीस गेल्या होत्या. त्या अनुषंगाने शोध सुरू होती. त्यावेळी हवालदार मारूती लाटणे, विनोद माने, तानाजी शिंदे, जयसिंग राजगे यांना उंब्रजचे दोघे चोरी करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार उंब्रज येथे जाऊन पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.

कऱ्हाड (जि. सातारा) : महिलांच्या गळ्यातील चेन स्नॅचींगसह दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड केली. दिवाळीच्या पूर्व संध्येला शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाने 13 गुन्हे उघडीस आणत चमकदार कारवाई केली. गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या दुचाकीवरून धुम स्टाईलने सोन साखळीच्या चोरीचे सहा, तर दुचाकीचे सात गुन्हे उघडकीस आणले. सोना साखळी चोरीत अक्षय शिवाजी पाटील (वय 22, रा. मंद्रुळकोळे, ता.पाटण), बंटी उर्फ विजय अधिक माने (रा. शितपवाडी, ता.पाटण), तर दुचाकी चोरीत ज्ञानेश उद्धव चव्हाण (22, रा. भवानवाडी-उंब्रज) व मनोज मुरलीधर विभुते (26, रा. मांगवाडी उंब्रज) यांना अटक झाली आहे. 

पोलिसांनी सांगितले, की शहरासह पाटण, ढेबेवाडी भागात चेन स्नॅचिंग करणारी टोळी कार्यरत होती. महिन्याभरापासून होणाऱ्या चोरीमुळे पोलिसही वैतागले होते. चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्या होत्या. त्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण शाखा शोध घेत होती. शाखेचे सहायक फौजदार राजेंद्र पुजारी, हवालदार सचिन साळुंखे, आनंद जाधव यांना त्यांच्या बातमीदारांकडून माहिती मिळाली. त्यानुसार ढेबेवाडी परिसरातील दोघांनी शहरासह पाटण परिसरात चेन स्नॅचिंग केल्याची माहिती त्यांना मिळाली. त्याच्या आधारे पोलिसांनी ढेबेवाडी येथून अक्षय पाटील व बंटी उर्फ विजय माने यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली. त्यावेळी त्यांनी शहरासह परिसर, पाटण परिसरात चेन स्नॅचिंग व चोऱ्या केल्याच्या सहा गुन्ह्यांची कबुली दिली. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. चोरीच्या दुचाकी विकणाऱ्या दोघांना गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली. त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या सात दुचाकी जप्त केल्या. 

पुणे, सोलापुरासह साताऱ्यात लूटमार करणाऱ्या माळशिरसच्या युवकांना अटक

महिन्यापूर्वी शहर हद्दीतून चार, उंब्रज येथून दोन व कोळसेवाडी (जि. ठाणे) येथून दुचाकी चोरीस गेल्या होत्या. त्या अनुषंगाने शोध सुरू होती. त्यावेळी हवालदार मारूती लाटणे, विनोद माने, तानाजी शिंदे, जयसिंग राजगे यांना उंब्रजचे दोघे चोरी करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार उंब्रज येथे जाऊन पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांची नावे ज्ञानेश चव्हाण व मनोज विभुते असल्याची खात्री केली. त्यांच्याकडे चौकशी केली. त्यावेळी शहरासह उंब्रज व ठाणे येथून सात दुचाकी चोरल्याची कबुली दिली. दोन्ही कारवाया पोलीस उपाधिक्षक डॉ. रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, राजेंद्र पुजारी, हवालदार सतीश जाधव, नितीन येळवे, जयसिंग राजगे, संजय जाधव, सचिन साळुंखे, मारूती लाटणे, विनोद माने, प्रफुल्ल गाडे, तानाजी शिंदे, आनंदा जाधव यांनी केली. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two-Wheeler Thieves Arrested In karad Satara News