esakal | दाेन रिव्हॉल्वरसह पाटण तालुक्यातील युवकास तासवड्यात अटक
sakal

बोलून बातमी शोधा

दाेन रिव्हॉल्वरसह पाटण तालुक्यातील युवकास तासवड्यात अटक

पोलिस निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड, हवालदार सुधीर बनकर, संजय शिर्के, अतिश घाडगे, विजय कांबळे, शरद बेबले, साबीर मुल्ला, मंगेश महाडिक, प्रवीण फडतरे, प्रमोद सावंत, मुनीर मुल्ला, नीलेश काटकर, विशाल पवार, रोहित निकम, मोहसीन मोमीन यांनी या कारवाईत भाग घेतला.

दाेन रिव्हॉल्वरसह पाटण तालुक्यातील युवकास तासवड्यात अटक

sakal_logo
By
तानाजी पवार

वहागाव (जि. सातारा) : तळबीड येथील तासवडे एमआयडीसीतील हॉटेलमध्ये रिव्हॉल्वर विकण्यासाठी आलेल्या युवकास पोलिसांनी छापा टाकून अटक केली. धनाजी कदम (वय 29, रा. शिंदेवाडी-मरळी, ता. पाटण) असे संशयिताचे नाव आहे. सातारा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून ही कारवाई करत दोन रिव्हॉल्वरसह तीन जिवंत काडतुसे असा एक लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
 
पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या नेतृत्वाखील कारवाई झाली. पोलिसांनी सागितले की, धनाजी कदम हा तळबीड एमआयडीसीतील हॉटेल अजंठा रिसॉर्टमध्ये दोन रिव्हॉल्वरसह येणार असल्याची माहिती सर्जेराव पाटील यांना मिळाली. त्याला ताब्यात घेण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड व पथकास त्यांनी सूचना दिल्या.

खासदार पाटलांचा पाठपुरावा, कऱ्हाडला श्वापद उपचार केंद्र मंजूर

स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकाने हॉटेल अजंठा रिसॉर्टबाहेर सापळा रचला. संबंधित व्यक्ती हॉटेलच्या बेसमेंटमध्ये असणाऱ्या डायनिंग हॉटेलमध्ये होती. तेथून त्या व्यक्तीस पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीमध्ये दोन देशी बनावटीची रिव्हॉल्वर व तीन जिवंत काडतुसे सापडली. पुढील कार्यवाहीसाठी त्यास तळबीड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

ऑनलाइन शिक्षणासाठी खुस्पे दाम्पत्याचे दातृत्व

पोलिस निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड, हवालदार सुधीर बनकर, संजय शिर्के, अतिश घाडगे, विजय कांबळे, शरद बेबले, साबीर मुल्ला, मंगेश महाडिक, प्रवीण फडतरे, प्रमोद सावंत, मुनीर मुल्ला, नीलेश काटकर, विशाल पवार, रोहित निकम, मोहसीन मोमीन यांनी या कारवाईत भाग घेतला.

Edited By : Siddharth Latkar