सातारा : वरकुटेच्या दोन तरुणांचा मृत्यू

चिकमहूदजवळ अपघात; अज्ञात वाहनाची मोटारसायकलला धडक
Two youth Varkute Malawadi Dies in Accident
Two youth Varkute Malawadi Dies in AccidentSakal

म्हसवड - अज्ञात वाहनाने मोटारसायकलला समोरासमोर जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात वरकुटे-मलवडी (ता.माण) येथील दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना चिकमहूद-दिघंची रस्त्यावर आज दुपारी चारच्या सुमारास घडली.

या अपघातातील मृतांची नावे सुशांत शांताराम जाधव (वय २८) व मंगेश शिवाजी पिसे (वय २८, दोघे रा.वरकुटे मलवडी, ता. माण) अशी आहेत. आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सुशांत जाधव व मंगेश पिसे हे मोटारसायकलवरून चिकमहूद (ता. सांगोला) ते दिघंची (जि.सांगली) रस्त्यावरून चिकमहूदकडे येत असताना हॉटेल विशालजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीस समोरासमोर जोरदार धडक दिली. या अपघातात सुशांत जाधव हा जागीच ठार झाला. त्याच्यासोबत असणारा मंगेश पिसे हा गंभीर जखमी झाला होता. त्याला पुढील उपचारासाठी सांगोला येथील खासगी दवाखान्यात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

या वेळी सागर जावीर, वैभव वाघमारे यांच्यासह उपस्थित नागरिकांनी तत्काळ १०८ या क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिकेला बोलावून घेतले. जखमी मंगेश यास रुग्णवाहिकेतून उपचारासाठी सांगोलाकडे पाठविण्यात आले. अज्ञात वाहन मोटारसायकलस्वारांच्या अंगावरून व डोक्‍यावरून गेल्याने रक्ताचा सडा पडलेला होता.

धोकादायक रस्त्यामुळे अनेकांचा बळी

पंढरपूर-मल्हारपेठ मार्गावरील चिकमहूद (ता. सांगोला) शिवारात येथे वळणावळणाचा धोकादायक रस्ता आहे. येथे यापूर्वीही अनेक वेळा अपघात होऊन अनेकांचा बळी गेला आहे. हा ब्लॅक स्पॉट दुरुस्त करण्याबाबत कार्यवाही व्हावी, अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com