esakal | जिल्हा परिषद अध्यक्षांचा इशारा; Home Isolation मधील फिरणा-यांवर गुन्हे दाखल करा

बोलून बातमी शोधा

जिल्हा परिषद अध्यक्षांचा इशारा; Home Isolation मधील फिरणा-यांवर गुन्हे दाखल करा

जिल्ह्यातील कवठे, वडूथ, क्षेत्र माहुली, पुसेगाव आणि वडगाव हवेली येथील आरोग्य केंद्रांत ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णांना जवळ सोय होऊ शकते असेही अध्यक्ष कबूलेंनी नमूद केले.

जिल्हा परिषद अध्यक्षांचा इशारा; Home Isolation मधील फिरणा-यांवर गुन्हे दाखल करा
sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा : सातारा जिल्ह्यात काही भागांमध्ये गृहविलगीकरणात असलेले रुग्ण घराबाहेर पडत असल्याची तक्रार सातत्याने कानावर येत आहे. तरी असे रुग्ण काेणाला आढळल्यास जवळच्या पाेलिस स्टेशऩला कळवावे असे सातत्याने आराेग्य विभागाच्या माध्यमातून सांगितले जात आहे. दरम्यान ही महत्वपुर्ण गाेष्ट आता जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबूले यांनी देखील मनावर घेतली आहे. काेराेनाबाधित असतानाही गृहविलगीकरणात असणारे रुग्ण घराबाहेर पडत असतील तर पाेलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करावा असा इशारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांनी दिला आहे. 

येथील जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत अध्यक्ष कबुले बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, शिक्षण व अर्थ समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण सायमोते आदी उपस्थित होते.

काळजी घ्या! परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे : रामराजे नाईक - निंबाळकर 

अध्यक्ष कबुले म्हणाले, ‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात कोरोना केअर सेंटर तसेच विविध आरोग्य केंद्रात वैद्यकीय कर्मचारी भरण्यात आले आहेत. त्यामुळे लोकांना आरोग्य सेवा देणे साेयीचे होईल. गृहविलगीकरणातील रुग्ण घराबाहेर पडत असतील तर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हाच दाखल करावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यातील कवठे, वडूथ, क्षेत्र माहुली, पुसेगाव आणि वडगाव हवेली येथील आरोग्य केंद्रांत ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णांना जवळ सोय होऊ शकते असेही अध्यक्ष कबूलेंनी नमूद केले.

कऱ्हाडात फॅन्सी नंबर प्लेटसह धूम स्टाइल सुसाट; पोलिसांची तब्बल 27 हजार युवकांवर कारवाई