Udayanraje Bhosale : राजभवन परिसरातच शिवस्मारक व्हावे: खासदार उदयनराजे; डॉ. आंबेडकरांच्या स्मारकासाठी प्रयत्नशील

Satara News : छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला दिशा देण्याचे काम केले. डॉ. आंबेडकर यांनी देशाला संविधानाची मोठी देणगी दिली आहे. साताऱ्यात डॉ. आंबेडकर राहात होते, त्या जागेवर स्मारक होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
Udayanraje Bhosale
Udayanraje Bhosalesakal
Updated on

सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा राज्यपाल मोठे नाहीत. त्यामुळे शिवाजी महाराज यांचे स्मारक अरबी समुद्राऐवजी मुंबईतील राजभवन परिसरातील ४० एकर जागेत व्हावे, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत केली. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला दिशा देण्याचे काम केले. डॉ. आंबेडकर यांनी देशाला संविधानाची मोठी देणगी दिली आहे. साताऱ्यात डॉ. आंबेडकर राहात होते, त्या जागेवर स्मारक होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com