उदयनराजेंनी केले पंतप्रधान नरेंद्र माेदींचे अभिनंदन

सिद्धार्थ लाटकर
Wednesday, 23 December 2020

अमेरिकेत भारताचे राजदूत तरनजीत सिंग संधू यांनी व्हाइट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांच्याकडून पंतप्रधान मोदींच्या वतीने नुकताच पुरस्कार स्वीकारला.

सातारा : लीजन ऑफ मेरीट पुरस्काराने सन्मान झालेल्या पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचे आज (बुधवार) खासदार उदयनराजे भाेसले यांनी अभिनंदन केले. खासदार भाेसले यांनी याबाबतचे ट्विट केले आहे.अमेरिका-भारत रणनीतिक भागीदारी वाढवण्यासाठी केलेल्या नेतृत्त्वासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लीजन ऑफ मेरिट ( Legion of Merit) पुरस्काराने नुकतेच सन्मानित केले आहे. अमेरिकेत भारताचे राजदूत तरनजीत सिंग संधू यांनी व्हाइट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांच्याकडून पंतप्रधान मोदींच्या वतीने नुकताच पुरस्कार स्वीकारला.

कडक सॅल्यूट! गावच्या भल्यासाठी सीमेवर लढणाऱ्या सैनिकाकडून लाखाचे बक्षीस जाहीर

Legion of Merit: डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पंतप्रधान मोदींचा सन्मान, लीजन ऑफ मेरिट पुरस्कार प्रदान

खासदार उदयनराजे भाेसले यांनी पंतप्रधान नरेंद्र माेदींचे अभिनंदन केले. ते लिहितात, भारत-अमेरिका संबंध समृद्ध करण्याच्या उत्कृष्ट प्रयत्नांसाठी अमेरिकेच्या अध्यक्षांनी ‘लीजन ऑफ मेरिट’ देऊन सन्मानित केल्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Udayanraje Bhosale Congratulated PM Narendra Modi For Legion Of Merit Award Satara News