Udayanraje Bhosale wedding anniversary celebration
esakal
सातारा : कॉलर उडवण्याची खास स्टाईल, चेहऱ्यावरची करारी नजर, बेधडक वक्तव्ये आणि आपल्या अनोख्या अंदाजाने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणारे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले म्हटले की, डोळ्यांसमोर एक रुबाबदार आणि बिनधास्त व्यक्तिमत्त्व उभे राहते. मात्र, याच ‘राजें’चा एक वेगळाच अंदाज सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. त्यांच्या या अंदाजाने चाहत्यांनाही सुखद धक्का दिला (Udayanraje Bhosale wife Damayantiraje Bhosale) आहे.