
सातारा : ग्रामीण विकासाच्या पायाभूत सुविधा अधिक भक्कम करण्यासाठी आणि कृषी क्षेत्रात सामूहिक शेती, सेंद्रिय शेती, शेतीपूरक व्यवसायासाठी सातारा जिल्ह्यातील विविध योजनांना केंद्राने भरभक्कम पाठबळ द्यावे. जिल्ह्यात कृषी विज्ञान केंद्रे, कृषी संशोधन केंद्रांची उभारणी करावी, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय कृषी व ग्रामीण विकासमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.