खासदार उदयनराजेंची कॉंग्रेसवर घणाघाती टीका; म्हणाले, इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी..

लोकांना मत मागण्यासाठी मुद्दाच नसल्याने सध्या संविधानाचा विषय पुढे आणण्यात आला आहे.
udayanraje bhosale
udayanraje bhosale Sakal

पाटण : लोकांना मत मागण्यासाठी मुद्दाच नसल्याने सध्या संविधानाचा विषय पुढे आणण्यात आला आहे. लोकं मत मागायला गेल्यावर पेढे देणार नाही तर जोडे देणार असे वातावरण असल्यामुळे संविधान बदलाचा मुद्दा घेऊन विरोधक मते मागत आहेत. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी आणीबाणी लागू केली.

लोकांना तुरुंगात घालून चिरडून टाकले. लोकांना मूलभूत हक्क देण्याचे काम ५५ वर्षात काँग्रेसला जमले नाही. आणीबाणी लागू करून इंदिरा गांधी यांनी संविधानाचा गळा कापून टाकला असा घणाघाती आरोप खासदार उदयनराजे भोसले यांनी कॉंग्रेसवर केला.

महायुतीचे उमेदवार खासदार भोसले यांच्या प्रचारार्थ येथील बैल बाजार मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,

लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाई, रमेश पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर, शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, प्रदीप पाटील, भरत पाटील, भाजपच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा कविता कचरे, नंदकुमार सुर्वे, अशोकराव पाटील, रामभाऊ लाहोटी, नाना सावंत, रामभाऊ डुबल आदी उपस्थित होते.

खासदार भोसले म्हणाले, पाटण तालुक्यात पर्यटन वाढीसाठी मी व शंभूराजे साहेब प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार हे कुठेही त्यात कमी पडणार नाही. स्थिर सरकार असल्यामुळे निधी कमी पडणार नाही. पाटण तालुक्यातील लहान गावातील रस्ते झाले आहेत.

इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा उमेदवार अजूनही ठरलेला नाही. त्यामुळे इंडिया आघाडीत विस्कळीत पण आहे. दहा वर्षात देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा विकास झाला आहे. या अगोदरच्या काळात फक्त घोषणा झाल्या त्याची अंमलबजावणी करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

जवान देशाचे संरक्षण करण्याचे काम करत आहेत. यांना सोय सुविधा देण्याचे काम पंतप्रधान मोदी यांनी केले. लोकांना मत मागण्यासाठी मुद्दाच नसल्याने सध्या संविधानाचा विषय पुढे आणण्यात आला आहे. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी आणीबाणी लागू केली. लोकांना तुरुगा त घालून चिरडून टाकले.

लोकांना मूलभूत हक्क देण्याचे 55 वर्षात काँग्रेसला जमले नाही. आणीबाणी लागू करून इंदिरा गांधी यांनी संविधानाचा गळा कापून टाकला. लोकं मत मागायला गेल्यावर पेढे देणार नाही तर जोडे देणार असे वातावरण असल्यामुळे संविधान बदलाचा मुद्दा घेऊन विरोधक मते मागत आहेत. विरोधकांच्या बोलताना बळी न पडता मतदान करावे.

महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत ते पालकमंत्री होते त्यांच्याकडे सिंचन विभाग होता यांनी एक नवा पैसा पाणी प्रकल्पासाठी दिला नाही. महाविकास आघाडीचे नेत्यांनी पंचायत राज व्यवस्थेच्या विचाराला मागेच तिलांजली दिली आहे. सत्ता एकवठल्यामुळे अहंकार निर्माण होऊन ते लोकांचे प्रश्न वीसरुन गेले. उमेदवार सक्षम व कोणत्या पक्षाचा आहे याकडे बघून मतदान केले पाहिजे. काम न करता मत मागणीची लायकी तरी आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

पाटणमधुन मताधिक्य देणार ः पालकमंत्री देसाई

पाटण तालुक्यातील रखडलेल्या प्रकल्पांना निधी व शासन खर्चाने शेती पाणी पुरवठा योजना करण्याची मागणी करुन पालकमंत्री देसाई म्हणाले, भाजप व शिवसेना यांचा लोकसभा व विधानसभा निवडणुकीचा पैरा ठरला असून चार पिढ्यांची नाळ असणारा आमचा कार्यकर्ता विधानसभा निवडणुकीसारखा प्रयत्न करून उदयनराजे भोसले यांना निवडून आणतील.

विकासाचे व्हीजन आणि विकसित भारताचे ध्येय असलेल्या नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी सर्व ताकदीनिशी तयार आहोत. सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे आम्ही चार आमदार असून आमदारकी लढवल्या सारखे चित्र दिसेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com