
सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांचा पगारवाढीचा करारनामा तातडीने करण्याच्या मागणीसह फिनॅकल सॉफ्टवेअरबाबतच्या तक्रारींबाबत योग्य उपाययोजना राबविण्याची मागणी संचालक तसेच खासदार उदयनराजे भोसले यांनी बँक व्यवस्थापनास दिलेल्या निवेदनात केली आहे. याच निवेदनात त्यांनी मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास आम्हाला वेगळा पवित्रा घ्यावा लागेल, असा इशाराही दिला आहे.