esakal | उदयनराजेंचे मित्रप्रेम; बाळासाहेबांच्या पाठीशी राहिले ठाम
sakal

बोलून बातमी शोधा

उदयनराजेंचे मित्रप्रेम; बाळासाहेबांच्या पाठीशी राहिले ठाम

आज (साेमवार) सकाळी 11 ते दुपारी एक या वेळेत सातारा विकास आघाडीतील इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करावे लागणार हाेते. अर्ज भरल्यानंतर त्याची छाननी प्रक्रिया पूर्ण करून उद्या (ता. 29) निवड जाहीर होणार आहे.

उदयनराजेंचे मित्रप्रेम; बाळासाहेबांच्या पाठीशी राहिले ठाम

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा : सातारा पालिकेतील सातारा विकास आघाडीच्या रिक्‍त स्वीकृत नगरसेवकपदाचे दावेदार शशांक उर्फ बाळासाहेब ढेकणे हे ठरणार आहेत. या निवडीसाठी आज (साेमवार) त्यांचा एकमेव अर्ज भरण्यात आला आहे. या पदासाठी वसंत जाेशी की बाळासाहेब ढेकणे यांची वर्णी लागणार याची सातारकरांना उत्सकुता लागली हाेती. अखेरीस खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांचे निकटचे मित्रवर्य बाळासाहेबांनाच पसंती दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
सदस्य संख्येनुसार सातारा पालिकेच्या सभागृहात सातारा विकास आघाडीच्या वाट्याला दोन नगरसेवकपदे आली आहेत. त्यापैकी एका जागेवर ऍड. दत्ता बनकर हे कायम असून दुसरे स्वीकृत नगरसेवक प्रशांत आहेरराव यांनी खासदार उदयनराजेंच्या आदेशानुसार राजीनामा दिला. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या पदासाठीची निवडणूक लांबणीवर पडली होती. आचारसंहिता संपल्यानंतर स्वीकृत नगरसेवक निवडीचा कार्यक्रम प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांच्या सूचनेनुसार नगराध्यक्षा माधवी कदम यांनी नुकताच जाहीर केला हाेता.

उदयनराजेंचा भाचा असल्याचे सांगून त्याने केला काेल्हापूरात दूसरा विवाह; 29 लाखांना फसविले
 
या कार्यक्रमानुसार आज (साेमवार) सकाळी 11 ते दुपारी एक या वेळेत सातारा विकास आघाडीतील इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करावे लागणार हाेते. अर्ज भरल्यानंतर त्याची छाननी प्रक्रिया पूर्ण करून उद्या (ता. 29) निवड जाहीर होणार आहे. या जागेसाठी वसंत जोशी आणि बाळासाहेब ढेकणे यांच्या नावांची चर्चा हाेती. आज केवळ ढेकणे यांचा एकमेव अर्ज आला असल्याने त्यांना नगरसेवक म्हणून खासदार उदयनराजेंनी पुन्हा एकदा पालिकेत पाठविल्याची चर्चा रंगली.

Wow Its So Sweet : चक्क शेतावर पर्यटक लुटताहेत स्ट्राॅबेरी खाण्याचा आनंद

loading image