esakal | महापुरुषाच्या नावाचा फलक फाडल्याप्रकरणी उदयनराजे समर्थक आक्रमक
sakal

बोलून बातमी शोधा

महापुरुषाच्या नावाचा फलक फाडल्याप्रकरणी उदयनराजे समर्थक आक्रमक

यावेळी उदयनराजे समर्थकांनी प्रकाराचा निषेध नाेंदविला. दरम्यान घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत. त्यांनी संबंधित फलक त्यांच्या ताब्यात घेतला. 

महापुरुषाच्या नावाचा फलक फाडल्याप्रकरणी उदयनराजे समर्थक आक्रमक

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांनी साता-यातील शुक्रवारी (ता.८) ग्रेड सेपरेटरचे (भुयारी मार्ग) उदघाटन केले. या ग्रेड सेपरेटरच्या भिंतीवर लावण्यात आलेल्या महापुरषांचा नावाचा फलक रात्री अनाेळखी व्यक्तींना फाडला. ही बाब निदर्शनास येताच उदयनराजे समर्थकांनी आज (शनिवारी) घटनास्थळी पाेचून निषेध नाेंदविला आहे.
उदयनराजेंचा सिंघम स्टाईल अंदाज; अभी के अभी म्हणत उडवली पुन्हा काॅलर  


छत्रपती संभाजीराजे भोसले भुयारी मार्ग असा नावाचा लावलेला फलक शुक्रवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी फाडल्याचे आज (शनिवार) काही नागरिकांच्या लक्षात आले. त्याची माहिती उदयनराजे समर्थकांना देखील मिळाली. या प्रकाराचा समाज माध्यमातून तीव्र निषेध नाेंदविण्यास प्रारंभ झाला. सकाळी नऊ वाजता उदयनराजे समर्थकांनी पाेवई नाका येथे जमण्यास प्रारंभ केला. त्याचप्रमाणे शिवभक्त देखील मोठ्या प्रमाणात घटनास्थळी जमा झाले.

मंगलाष्टका सुरु असतानाच पोलिस शिरले मंडपात अन् म्हणाले, सावधान!  


यावेळी उदयनराजे समर्थकांनी प्रकाराचा निषेध नाेंदविला. दरम्यान घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत. त्यांनी संबंधित फलक त्यांच्या ताब्यात घेतला. दरम्यान संबंधितांना शाेधून त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी उदयनराजे समर्थकांनी पाेलिस विभागास केली आहे. 

बॉम्बेचे मुंबई झाले ना! औरंगाबादच्या नामांतरावर उदयनराजेंची स्पष्ट भूमिका 

loading image