
सातारा : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा अन्य नेते ते खरोखरच छत्रपती शिवाजी महाराजांना मानत असतील तर, महापुरूषांची बदनामी करणाऱ्यांवर कडक शिक्षेची तरतूद असलेल्या कायदा विधानसभेच्या चालू अधिवेशनात मंजूर करावा, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पत्रकारपरिषदेत केली. हा कायदा न केल्यास अधिवेशन संपल्यावर महाराष्ट्रातील जनता सत्ताधाऱ्यांना सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.