'या' कामाचे श्रेय फक्त आणि फक्त उदयनराजेंच; काेणी उठविला आवाज वाचा सविस्तर

'या' कामाचे श्रेय फक्त आणि फक्त उदयनराजेंच; काेणी उठविला आवाज वाचा सविस्तर

सातारा ः सातारा विकास आघाडी दिलेली वचने पूर्ण करते. बाकीच्यांचे मला माहिती नाही. पण सातारा विकास आघाडीच्या नगरसेवकांनी जे काम हाती घेतले जाते ते तडीस लावले जाते. यादोगोपाळ पेठेतील (कै.) श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज उर्फ दादा महाराज उद्यान पूर्णत्वास नेणारच अशा शब्द खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला. दरम्यान,साविआच्या वचननाम्यातील उद्यानाचा प्रश्न लवकरच निकाली काढण्यात येणार आहे, अशी माहिती माजी उपाध्यक्षा दीपाली गोडसे यांनी दिली.
काॅंग्रेसच्या माेठ्या नेत्याला घेरण्याची भाजपची खेळी
 
सातारा शहरातील विविध विकास कामाच्या पाहणी दरम्यान त्यांनी यादोगोपाळ पेठेतल्या नियाेजीत (कै) श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज उर्फ दादा महाराज उद्यानास भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष माधवी कदम, उपाध्यक्ष किशोर शिंदे, पाणी पुरवठा सभापती यशोधन नारकर, नियोजन सभापती ज्ञानेश्वर फरांदे, माजी उपाध्यक्षा दीपाली गोडसे, नगरसेवक ऍड. दत्ता बनकर, राजू गोडसे उपस्थित होते.
 
प्रारंभी दीपाली गोडसे म्हणाल्या सन 2008 साली सातारा विकास आघाडीच्या माध्यमातून खासदार उदयनराजे यांच्या नेतृत्वाखाली यादोगोपाळ पेठेतून निवडणूक लढण्याची संधी मिळाली. त्यात उदयनराजेंच्यामुळे विजय मिळाला. यावेळी या भागातील 134 व 134 अ यादोगोपाळ पेठ येथील जागेवर बगिचाचे आरक्षण गेले अनेक वर्ष होते. हा विषय उदयनराजेंच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी सर्वसाधारण सभेत ठराव करुन ती जागा पालिकेकडे हस्तांतरीत करण्यास सांगितले. सन 2008 साली ठराव करुन जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केला. जिल्हाधिकाऱ्यांनी ती जागा 2011 मध्ये विनामोबदला पालिकेकडे हस्तांतरीत केली. तेथील स्थानिक मुस्लिम बांधवांनी ही जागा त्यांची असल्यासंदर्भात वक्‍फव बोर्डाकडे तक्रार केली. याबाबत त्यावेळी मी औरंगाबाद न्यायालयात दाद मागितली. त्यावर सादिक शेख, अस्लम बागवान यांनी खासदार उदयनराजे यांच्याकडे मध्यस्ती करण्यासंदर्भात विनंती केली.
नव्या आदेश वाचा, लग्नात लिंबू धरण्यास मामाही उपस्थित राहू शकणार नाही

त्यानंतर तत्कालिन मुख्याधिकारी अभिजीत बापट, ऍड. बनकर, सतीश साखरे, अभियंता शिंदे, वक्‍फव बोर्डाचे पदाधिकारी यांच्यात चर्चा होवून दाखल तक्रार माघार घेण्यात आली. नगरपालिकेस बगिचा विकसीत करण्यास परवानगी देण्यात आली. त्यानंतर चार नोव्हेंबर 2016 रोजी खासदार उदयनराजे, नक्षत्रच्या अध्यक्षा दयमंतीराजे भोसले, आमदार शिवेंसिंहद्रराजे भोसले यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. उदयनराजे यांच्या मार्गदर्शनाखाली मी सलग दहा वर्ष पाठपुरावा करुन वैशिष्टयपूर्ण योजनेअंतर्गत (कै).श्री.छ.प्रतापसिंह महाराज उर्फ दादा महाराज उद्यान विकसीत करण्यासाठी सुमारे तीन कोटी 50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन घेतला. तसेच त्या कामांचे निविदा सुद्धा काढली. परंतु सन 2016 च्या पालिका निवडणूकीत या भागात सातारा विकास आघाडीचा नगरसेवक नसल्याने हे काम आम्ही केले असे काही जण म्हणत आहेत. पण त्यात कोणतेही तथ्य नसून या कामाचे श्रेय फक्त आणि फक्त उदयनराजे व सातारा विकास आघाडीला जाते. श्रेय घेण्याचा कोणीही प्रयत्न करु नये अशी टिप्पणी साै. गाेडसे यांनी केली आहे.
 
प्रवेशासाठी खोटी प्रमाणपत्रे देणाऱ्यांवर गुन्हा, तंत्रशिक्षण संचालनालयाचा प्रवेश रद्दचा इशाराही

उरमोडी धरणानजीकच्या 'त्या' प्रसिद्ध हाॅटेल चालकावर गुन्हा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com