

Satara Power Play: Udayanraje Camp Firm on Khed, Kodoli, Shendre, Nagthane
Sakal
सातारा : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी सातारा तालुक्यातील गट, गणांच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरविण्यासाठी आज सोनगाव बंगला येथे दोन्ही राजेंमध्ये खलबते झाली. सुमारे दोन तास झालेल्या या चर्चेत तालुक्यातील गट, गणांची वाटणी कशी करायची, याविषयी चर्चा झाली. खेड, कोडोली, शेंद्रे, नागठाणे या गटांसाठी उदयनराजेंचा गट आग्रही असल्याची चर्चा आहे. उद्या (मंगळवारी) जागा वाटपाचे चित्र निश्चित होणार असल्याचे दोन्ही राजेंच्या गटांकडून सांगण्यात आले आहे.