ओबीसी चळवळीला ताकद देणार; उदयसिंह पाटलांची कऱ्हाडात ग्वाही

राज्यात अल्पसंख्य असलेल्या ओबीसी समाजाने नेहमीच कॉंग्रेसच्या विचारांची पाठराखण केली आहे.
Udaysingh Patil
Udaysingh Patilesakal
Updated on

कऱ्हाड (सातारा) : राज्यात अल्पसंख्य असलेल्या ओबीसी समाजाने (OBC Community) नेहमीच कॉंग्रेसच्या (Congress) विचारांची पाठराखण केली आहे. राजकारणात अनेक स्थित्यंतर आली, तरीही ओबीसी समाजाने कायम कॉंग्रेस पक्षाची राष्ट्रीय विचारधारा जपली आहे. यापुढील काळात ओबीसी समाजाला ताकद देणार असल्याची ग्वाही रयत साखर कारखान्याचे अध्यक्ष ऍड. उदयसिंह पाटील-उंडाळकर (Udaysingh Patil) यांनी दिली. (Udaysingh Patil Testifies To Give Strength To OBC Community Satara News)

काले येथील भानुदास माळी यांची महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या ओबीसी विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली. त्याबद्दल बाजार समितीच्या कार्यालयात ऍड. उंडाळकरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. बाजार समितीचे सभापती महादेव देसाई व मान्यवर उपस्थित होते. ऍड. पाटील म्हणाले, "बदलत्या राजकारणामुळे ओबीसी समाजाला म्हणावी अशी ताकद मिळाली नाही. मुळातच अल्पसंख्य असल्याने या समाजाला सत्तेच्या विविध प्रवाहांपासून दूर राहावे लागले; परंतु हळूहळू कालचक्र बदलत चालले आहे. भानुदास माळी यांनी ओबीसी समाजाच्या प्रगतीसाठी सातत्याने संघर्ष केला. सर्व जाती-धर्मांना आपल्या पोटात घेऊन धर्मनिरपेक्ष समाजरचनेचा पुरस्कार करणाऱ्या कॉंग्रेसची ओबीसी समाज हीच खरी शक्ती आहे. त्यासाठी पुढील काळात ओबीसी समाजाला ताकद देऊ.'' श्री. माळी यांनी आभार मानले.

Reservation : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना खरंच 10 वर्षांसाठी आरक्षण हवे होते? जाणून घ्या 'सत्य'

Udaysingh Patil Testifies To Give Strength To OBC Community Satara News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Administrative Apathy Hits Healthcare Services; Health Committee Activities at Standstill
Satara Mahimangad Fort conservation project
Rural Youth’s Inspiring Journey: Harsh Indalkar Joins the Indian Air Force
Swimming Trip Ends in Tragedy: Young Boy Dies After Drowning in Karad
Marathi News Esakal
www.esakal.com