
कऱ्हाड : सामान्य कार्यकर्त्यांचे जिल्ह्यात संघटन उभे केले आहे. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी, कार्यकर्त्यांना राजकीय ताकद मिळावी, यासाठी काँग्रेसच्या विचारांशी साधर्म्य असलेल्या आणि सत्तेतील पक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत शनिवारी (ता. १९) राष्ट्रवादीचा पक्षप्रवेश सोहळा आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन केल्याची माहिती रयत साखर कारखान्याचे अध्यक्ष अॅड. उदयसिंह पाटील- उंडाळकर यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.