Ahilyanagar Crime : सहा जणांच्या मारहाणीत उक्कडगावमध्ये पतीचा मृत्यू; पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल
आतड्यांना गंभीर दुखापत झाली असल्याने दवाखान्याचा खर्च परवडण्यासारखा नसल्याने त्याला पुणे येथील ससून रुग्णालयात हलविण्यात आले. प्रभाकर तुपेरे याचा शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला.
श्रीगोंदे : जेवण वाढण्याच्या किरकोळ कारणावरून पती-पत्नीमध्ये झालेल्या वादातून सहा जणांनी केलेल्या मारहाणीमुळे पतीचा मृत्यू झाल्याची घटना उक्कडगाव शिवारात घडली. प्रभाकर अरुण तुपेरे (वय ३६, रा. उक्कडगाव, ता. श्रीगोंदे) असे मयत तरुणाचे नाव आहेत.