Satara Crime : दारूचे बिल देण्यावरून हॉटेल मॅनेजरला लाथाबुक्क्यांनी मारहाण; CCTV च्या वायरी तोडल्या, खुर्च्या दिल्या फेकून

Liquor Bill Dispute Turns Violent at Umraj Hotel : उंब्रज येथील हॉटेल वंदन बिअर बारमध्ये दारू बिलाच्या कारणावरून मॅनेजरला मारहाण करून सात संशयितांनी ७० हजार रुपयांची रक्कम लंपास केली.
Satara Crime News

Satara Crime News

esakal

Updated on

उंब्रज (सातारा) : दारूचे बिल देण्याच्या कारणावरून हॉटेल मॅनेजरला मारहाण (Umraj Hotel Manager Assaulted Over Liquor Bill Dispute) करत गल्यातील ७० हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केल्याप्रकरणी उंब्रज पोलिस ठाण्यात सात जणांवर गुन्हा दाख करण्यात आला आहे. प्रथमेश चंद्रकांत पाटील (वय २६ मूळ रा. मंद्रुळकोळे, सध्या रा. वृदांवन सिटी, मलकापूर), अजय बापूराव यादव (वय २० रा. तुळसण), विराज प्रकाश देसाई (वय २० रा. कुसूर), दत्ता कोळेकर (रा. मुनावळे) यासह अनोळखी तीन जण अशी संशयितांची नावे आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com