'कृष्णा'च्या पहिल्याच निवडणुकीत उंडाळकर गटाचा कस लागणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Adv. Udaysingh Patil-Udalkar

कऱ्हाडला उंडाळकर गट ‘कृष्णा’त नेहमीच ताकद देण्यात सरस ठरतो. यावेळीही तो गट सक्रिय आहे.

'कृष्णा'च्या पहिल्याच निवडणुकीत उंडाळकर गटाचा कस लागणार?

कऱ्हाड (सातारा) : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या (Yashwantrao Mohite Krishna Co-operative Sugar Factory) निवडणुकीत १९८९ पासून सक्रिय उंडाळकर गट यावेळी कोणाकडे झुकणार, याची उत्सकता आहे. नैसर्गिक न्यायाला अनुसरून भूमिका घेणारे ज्येष्ठ नेते विलासराव पाटील-उंडाळकर यांच्यानंतर होणाऱ्या ‘कृष्णा’च्या पहिल्याच निवडणुकीत (Krishna Sugar Factory Election) उंडाळकर गटाचा (Undalkar group) कस लागणार आहे. जिल्हा बँकेसह अन्य निवडणुकांचाही त्यावर परिणाम असणार आहे. कार्यकर्त्यांची मानसिकता अन्‌ नेत्यांची मते यातील घालमेल व काँग्रेस पक्ष म्हणून आमदार पृथ्वीराज चव्हाण गटाच्या (MLA Prithviraj Chavan Group) भूमिकेच्या किनाऱ्याचाही विचार करून उंडाळकर गटाला निर्णय घ्यावा लागणार आहे. (Undalkar Group Active In The Election Of Krishna Sugar Factory Satara Political News)

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यात संघर्ष नवा नाही. १९८९ पासून संघर्ष सुरू आहे. कारखान्याचे कऱ्हाडसह सांगली जिल्ह्यातील वाळवा, शिराळा, कडेगाव, पलूस तालुक्यांतील १३२ गावांचे कार्यक्षेत्र आहे. कऱ्हाडला उंडाळकर गट ‘कृष्णा’त नेहमीच ताकद देण्यात सरस ठरतो. यावेळीही तो गट सक्रिय आहे. युवा नेते अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यातील सलोख्याने दक्षिणेत काँग्रेसची ताकद वाढली आहे. त्याचा कारखाना निवडणुकीत कसा फायदा करून घेता येईल, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. उंडाळकर गटही आमदार चव्हाण यांच्यासोबत दोन्ही मोहित्यांच्या एकत्रिकरणात सक्रिय होता. आमदार चव्हाण यांनी एकत्रिकरणाचे प्रयत्न थांबविल्याने उंडाळकर गट काय करणार, गटाचे नेते अॅड. उदयसिंह पाटील-उडाळकर (Adv. Udaysingh Patil-Udalkar) यांची भूमिका काय असणार, याकडे लक्ष लागून आहे.

मध्यंतरी अॅड. उदयसिंह यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचीही भेट घेऊन चर्चा केली होती. त्यामुळे ‘कृष्णा’च्या निवडणुकीत त्यांच्या भूमिकेकडे लक्ष आहे. ज्येष्ठ नेते (कै.) विलासराव पाटील-उंडाळकर यांच्यानंतर कारखान्याची पहिली निवडणूक आहे. त्यात बऱ्यापैकी बेरजेच्या राजकारणाचा अॅड. उदयसिंह प्रयत्न करत आहेत. त्यांनी व्यक्‍तिगत गाठीभेटीही घेतल्या आहेत. त्यामुळे ‘कृष्णा’च्या निवडणुकीत निर्णय घेताना अॅड. उदयसिंह यांच्यासमोर जिल्हा बँकेचा प्रश्न महत्त्‍वाचा असणार आहे. त्यामुळे त्यांची भूमिका अत्यंत महत्त्‍चाची ठरणार आहे.

भूमिकाच निर्णायक...

उंडाळकर गटाने १९९९ ते २०१० या निवडणुकीत घेतलेल्या भूमिका त्यावेळी संबंधित गटाला निर्णायक यशाकडे नेणाऱ्या ठरल्या. यावेळीही त्याबाबतची उत्सुकता ताणली आहे. आता पुन्हा दहा वर्षाने निर्णय घेण्याची वेळ उंडाळकर गटावर आली आहे. त्यासाठी अधिक काळजीपूर्वक त्याचा निर्णय घ्यावा लागणार आहे.

Undalkar Group Active In The Election Of Krishna Sugar Factory Satara Political News

टॅग्स :Undalkar group