
-हेमंत पवार
कऱ्हाड : अखेरच्या श्वासापर्यंत कॉंंग्रेसची विचारधारा जाेपासलेल्या माजी मंत्री (कै.) विलासराव पाटील-उंडाळकर यांचे पुत्र ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर हे कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आहेत. लवकरच कॉंग्रेसला रामराम करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे घड्याळ हातात बांधणार आहेत. ॲड. उंडाळकर यांची उपमुख्यमंत्री पवार यांच्याबरोबर त्यासंदर्भात प्राथमिक चर्चा झाली असून, कार्यकर्त्यांचा मेळावा आयाेजित करून त्यासंदर्भातील निर्णय लवकरच जाहीर करणार आहेत. त्यामुळे कऱ्हाड दक्षिणमध्ये कॉंग्रेसला पर्यायाने माजी मुख्यमत्री पृथ्वीराज चव्हाण यांना धक्का बसणार आहे.