Satara News : ग्रामसभेत निर्णय! जिल्हा परिषद धुमाळवाडी शाळेत पाल्याचा प्रवेश घेतल्यास घरपट्टी माफ; पटवाढीसाठी प्रयत्न
काही ग्रामस्थांनी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेचा जिव्हाळ्याचा विषय मांडला. गावात आदर्श प्राथमिक शाळा ही पहिली ते सातवीपर्यंतची आहे; पण शाळेचा दिवसेंदिवस पट कमी होऊ लागला आहे.
Dhumalwadi villagers in Gram Sabha approving the decision to waive property tax for ZP school admissions.Sakal
दुधेबावी : जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या घटू लागल्याने धुमाळवाडी (ता. फलटण) येथील ग्रामस्थांनी गावातील प्राथमिक शाळेत नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा पाणी व घरकर माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.