कऱ्हाड: साताऱ्यातील साहित्य संमेलनाचा मी अध्यक्ष झालो म्हणून नव्हे, तर महाराष्ट्रभर मराठी भाषा, साहित्य, संस्कृती आणि इतिहासाच्या विचारांचा कुठेतरी ऱ्हास होताना दिसत आहे. ही पडझड वेळेत आपण थांबवली नाही, तर उद्या खूप वाईट दिवस येतील, अशी खंत ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी आज येथे व्यक्त केली.