
मल्हारपेठ : उरुल धरणाचे काम चालू असताना दोन कामगारांचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सुरक्षेच्या कोणत्याच उपाययोजना नसल्याने नाहक दोन कामगारांना जीव गमवावा लागला. दोन महिन्यांत दोन घटनांमुळे कामगारांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे दिसून येते. त्यामुळे आणखी किती कामगारांचा जीव गेल्यानंतर लघुपाटबंधारे विभाग व प्रशासन याची दखल घेणार? याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.