कोपर्डे हवेली : श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी नवरत्न मंदिरात आज घटस्थापना

जयंत पाटील
Monday, 16 November 2020

सात महिन्यांपासून बंद असणारे मंदिर आज दिवाळी पाडव्याला उघडून घटस्थापना होणार आहे.
 

कोपर्डे हवेली (जि. सातारा) : येथील ग्रामदैवत श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी नवरत्न मंदिर  आजपासून (ता. 16) भाविकांना दर्शनासाठी खूले करण्यात आले आहे. या मंदिरात भाविकांची गर्दी हाेणार हे लक्षात घेऊन व्यवस्थापनाने याेग्य ते नियाेजन करण्यास प्रारंभ केला आहे.

उपवास काळातील 12 दिवस देवाला पोषाखाद्वारे वेगवेगळे रूप दिले जाते. बलिप्रतिपदा, दीपवाली पाडव्याला मंदिरामध्ये घटस्थापना करून उपवासाची सुरुवात होते व एकादशीला उपवासाची सांगता होते.

गोंदवलेतील दर्शनासाठी नावनोंदणी आवश्यक; ऑनलाइन दर्शनाचीही मुभा

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सात ते आठ महिन्यांपेक्षा अधिक काळापासून मंदिरे बंद आहेत; परंतु राज्य सरकारने आजपासून (साेमवार) मंदिरे खुली करण्यास परवानगी दिली आहे. योगायोगाने आज सिद्धनाथ मंदिरात घटस्थापना होणार आहे. सात महिन्यांपासून बंद असणारे मंदिर आज दिवाळी पाडव्याला उघडून घटस्थापना होणार आहे.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Utsav In Shri Siddhnath Mata Jogeshwari Navratna Mandir Koprde Haveli Satara News