esakal | satara: मलकापूर वसुंधरा अव्वल ठरेल: प्रांताधिकारी उत्तम दिघे
sakal

बोलून बातमी शोधा

majhi vasundhara

स्वच्छ, सुंदर व माझी वसुंधरा अभियानामध्ये मलकापूर पहिला क्रमांक प्राप्त करेल, असा विश्वास प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी व्यक्त केला.

मलकापूर वसुंधरा अव्वल ठरेल: प्रांताधिकारी उत्तम दिघे

sakal_logo
By
राजेंद्र ननावरेे

मलकापूर (सातारा): पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनामुळे आणि मनोहर शिंदे यांच्यासारख्या चांगल्या नेतृत्वामुळे पालिकेने देशात नावलौकिक मिळवला आहे. आता स्वच्छ, सुंदर व माझी वसुंधरा अभियानामध्ये मलकापूर पहिला क्रमांक प्राप्त करेल, असा विश्वास प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी व्यक्त केला.

‘माझं मलकापूर माझी जबाबदारी’अनुषंगाने पालिकेच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी स्पर्धा, आरोग्य तपासणी शिबिर, कोरोना काळात काम केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार, एक शहर एक गणपती अभियानात भाग घेतलेल्या मंडळाचा सत्कार, मोफत घरपोच सुधारित सातबारा वाटप वेळी श्री. दिघे बोलत होते.

तहसीलदार विजय पवार, नगराध्यक्ष निलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, इंद्रजित चव्हाण, बांधकाम सभापती राजेंद्र यादव, नियोजन शिक्षण सभापती प्रशांत चांदे, नगरसेवक सागर जाधव, आबासाहेब सोळवंडे, आनंदी शिंदे, कमल कुऱ्हाडे, गीतांजली पाटील, नंदा भोसले, स्वाती तुपे, मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर, मंडल अधिकारी पी. डी. पाटील, तलाठी दीपक कामठेकर उपस्थित होते.

हेही वाचा: कऱ्हाडसह मलकापूर पालिकेचाही डंका; नगरपंचायत गटात राज्यात तृतीय

श्री. दिघे म्हणाले, ‘‘महात्मा गांधींनी अहिंसा शस्त्र दिले. या शास्त्राचा उपयोग प्रत्येकाने करावा, असे शस्त्र यापुढे कधीही तयार होणार नाही. स्वच्छ व माझी वसुंधरा अभियानात नागरिकांनी आणखी एक पाऊल पुढे टाकावे.’’ श्री. शिंदे यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र यादव यांनी आभार मानले. ज्ञानदेव साळुंखे व प्रेमांकी देसाई यांनी सूत्रसंचालन केले.

पालिकेचे कोरोनात कौतुकास्पद काम

कोरोना काळात पालिकेने अधिकृत आरोग्य व शिक्षण विभाग नसताना कोणतीही अडचण न सांगता कौतुकास्पद काम केले आहे. मृत्यू दर जास्त झाल्यानंतर शहराला स्मशानभूमी नव्हती, तरी कोणतेही आढेवेढे घेतले नाहीत. अंत्यसंस्कारासाठी लोक उपलब्ध होत नव्हते. मनोहर शिंदे यांनी मंगळवेढा येथून ते लोक उपलब्ध करून अंत्यसंस्काराची सोय केली, अशी ग्वाही प्रांताधिकारी दिघे यांनी दिली.

loading image
go to top