esakal | लस घ्यायला निघालात? सोबत आधार कार्ड, पॅन कार्ड घेऊन जा!
sakal

बोलून बातमी शोधा

Vaccination campaign

आतापर्यंत कृष्णा हॉस्पिटलमधून सहा हजारहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तसेच पहिल्या टप्प्यात जवळपास नऊ हजार जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

लस घ्यायला निघालात? सोबत आधार कार्ड, पॅन कार्ड घेऊन जा!

sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड (सातारा) : कोरोनाविरुद्धच्या लढ्यातील लसीकरण मोहिमेसाठी (Vaccination campaign) कृष्णा हॉस्पिटल (Krishna Hospital) पुन्हा एकदा सज्ज झाले आहे. कृष्णा हॉस्पिटलमध्ये कोव्हिशिल्ड लशीचे (Covishield Vaccine) सहा हजार, तर कोव्हॅक्सिनचे (Covaxin vaccine) दोन हजार ८८० डोस उपलब्ध झाले आहेत. गुरुवारपासून (ता. २२) हॉस्पिटलमध्ये १८ वर्ष पूर्ण झालेल्या व त्यापुढील वयाच्या लोकांना माफक दरात ही लस उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी दिली. (Vaccination Will Start From Thursday At Krishna Hospital In Karad bam92)

पत्रकातील माहिती अशी : कोरोनाविरुद्धच्या लढ्यात कृष्णा हॉस्पिटल सुरवातीपासूनच अग्रेसर राहिले आहे. कोरोनावरील उपचारासाठी स्वतंत्र वॉर्ड निर्मितीबरोबरच कोरोना चाचणी व लसीकरणात कृष्णा हॉस्पिटल नेहमीच आघाडीवर आहे. आतापर्यंत कृष्णा हॉस्पिटलमधून सहा हजारहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तसेच पहिल्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेंतर्गत कृष्णा हॉस्पिटलमध्ये जवळपास नऊ हजार जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. या लसीकरण मोहिमेचा वेग वाढविण्याच्या उद्देशाने कृष्णा हॉस्पिटल पुन्हा एकदा सज्ज झाले असून, गुरुवारपासून हॉस्पिटलमध्ये सकाळी साडेनऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत नियमित लसीकरणाला प्रारंभ होत आहे.

हेही वाचा: लसीकरणावरून कोळकीत वाद; पहाटेपासून केंद्रावर लांबलचक रांगा

Krishna Hospital

Krishna Hospital

कोव्हिशिल्डच्या एका डोसची किंमत ७८० रुपये असून, कोव्हॅक्सिनच्या एका डोसची किंमत एक हजार २०० रुपये आहे. लसीकरणासाठी येताना नागरिकांनी सोबत आधार कार्ड, पॅन कार्ड व आधारला लिंक असणारा मोबाईल आणावा. ज्यांना रक्त पातळ होण्याच्या गोळ्या सुरू आहेत अशा रुग्णांनी, इमनोकोंप्रमाईज रुग्ण, तसेच मधुमेही अथवा उच्चरक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी आपल्या डॉक्टरला तब्येत दाखवून, त्यांच्याकडून लस घेण्याबाबतचे ना हरकत प्रमाणपत्र घेऊन यावे. कोरोनावर प्रतिबंध आणण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे असल्याने नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता लसीकरणासाठी पुढे यावे, असे आवाहन डॉ. भोसले यांनी केले आहे.

Vaccination Will Start From Thursday At Krishna Hospital In Karad bam92

loading image