Masur Crime : वडिलाकडून मुलाचा नदीपात्रात ढकलून खून; वडोली भिकेश्वरातील गूढ उलगडले

पत्नीवरील चारित्र्याच्या संशयावरून वडिलानेच स्वत:च्या मुलाला नदीत ढकलून देऊन खून केल्याचे आले उघडकीस.
mallikarjun aarekari and siddharth aarekari

mallikarjun aarekari and siddharth aarekari

sakal

Updated on

मसूर - वडोली भिकेश्वर परिसरातील कृष्णा नदीपात्रात सापडलेल्या अनाेळखी सहा वर्षांच्या बालकाच्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. वडिलानेच संबंधित बालकाला नदीत ढकलून देऊन खून केल्याचे तपासात उघडकीस आले. पत्नीवरील चारित्र्याच्या संशयावरून मुलाचा खून केल्याची कबुलीही वडिलाने पोलिसांना दिली आहे. सिद्धार्थ मल्लिकार्जुन आरकेरी (वय सहा, रा. नागठाणे, ता. विजापूर, कर्नाटक) असे मृत बालकाचे नाव आहे. वडील मल्लिकार्जुन आरकेरी यानेच हा खून केल्याची कबुली दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com