
वडूज : येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा मनीषा काळे यांच्याविरोधात नगरपंचायतीच्या १६ सदस्यांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडे सोमवार अविश्वास ठराव दाखल केला आहे. नगरपंचायतीची निवडणूक २०२२ मध्ये झाली. त्यामध्ये नऊ महिला व आठ पुरुष सदस्य आहेत, तर ११ फेब्रुवारी २०२२ ला झालेल्या पदाधिकारी निवडीत सौ. काळे यांची नगराध्यक्षपदी निवड करण्यात आली; परंतु त्या नगराध्यक्ष पदावर आल्यापासून चुकीच्या पद्धतीने वागत आहेत.