Vaduj News : पाण्यासाठी नाचते मी पर्वा कुणाची...; वडूजमध्ये पाणी आंदोलनस्थळी वाघ्या मुरळीचे जागरण

खटाव तालुक्यात शेती पाणी समस्या गंभीर झाली असून याकडे प्रशासन गांभीर्याने घेत नाही. तर खटाव माणचे लोकप्रतिनिधी देखील दुजाभावपणा करीत आहेत.
Waghya Murali
Waghya Muralisakal

वडूज - लाज धरा पाव्हनं जरा जनाची मनाची.... पाण्यासाठी नाचते मी पर्वा कुणाची...अशी आर्त साद घालत आज खटाव तालुक्याच्या पाणी प्रश्नासाठी खटाव तालुका पाणी संघर्ष समितीच्या वतीने प्रशासनाच्या दारात जागरण, गोंधळ घालण्यात आला.

खटाव तालुक्यात शेती पाणी समस्या गंभीर झाली असून याकडे प्रशासन गांभीर्याने घेत नाही. तर खटाव माणचे लोकप्रतिनिधी देखील दुजाभावपणा करीत आहेत. खटाव तालुक्याची शेती पाणी समस्या सोडविण्यासाठी येरळा नदी प्रवाहित करून येरळवाडी धरण भरावे या मागणीसाठी खटाव तालुका पाणी संघर्ष समिती व सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकऱ्यांच्यावतीने येथील तहसिलदार कार्यालयाच्या प्रवेशदारात काल (सोमवारी ता. २६) पासून बेमुदत उपोषण व धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. उपोषणात निमंत्रक विजय शिंदे, अनिल पवार, नाना पुजारी, सुर्यभान जाधव, दत्तूकाका घार्गे आदी सहभागी झाले आहेत.

आज येथील तानाजीराव दळवी यांच्या जयमल्हार जागरण पार्टीचा आंदोलनस्थळी जागरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यामुळे तहसिलदार कार्यालयात कामासाठी आलेल्या लोकांची आंदोलनस्थळी मोठी गर्दी जमली होती. तालुक्याच्या शेती पाणी समस्येबद्दल या निमित्ताने नागरिकांत मोठी चर्चा होत होती. जयमल्हार जागरण पार्टीच्या कलाकारांनीदेखील तालुक्याच्या शेती पाणी समस्येवर समयोचित गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

दरम्यान आज कृष्णा सिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती पी. आर. यादव, उरमोडी उपसा सिंचना विभागाचे शाखा अभियंता डी.जे. जाधव तसेच अन्य अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. आंधळी धरणात कोणत्या निकषातून पाणी सोडले त्याची आम्हाला माहिती द्यावी तसेच तेच निकष वापरून येरळवाडी तलावातही पाणी सोडण्याची आग्रही मागणी यावेळी आंदोलकांनी केली. या प्रश्नावर अधिकारी निरूत्तर झाल्याने ही चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशीही हे आंदोलन सुरूच राहिले.

आंदोलनस्थळी फासाचे दोर....

पाण्याअभावी खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांपुढे मोठे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे पाण्याअभावी शेतकऱ्यांसमोर आता आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगत आंदोलकांनी आंदोलनस्थळी फासाचे दोर बांधले होते. हे दोर सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com