कसबा तारळे: कोसळलेल्या दरडीच्या मुरूमाची विक्री होत असल्याचा शेतकऱ्यांना संशय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कसबा तारळे: दरडीच्या मुरूमाची विक्री होत असल्याचा शेतकऱ्यांना संशय

कसबा तारळे: दरडीच्या मुरूमाची विक्री होत असल्याचा शेतकऱ्यांना संशय

कसबा तारळे: राधानगरी तालुक्यातील गुडाळवाडी नजीक काल कोसळलेल्या दरडीचे ढीग हटविण्याच्या नावाखाली मुरूमाची विक्री होत असल्याचा संशय संबंधीत शेतकऱ्यांनी व्यक्त केला. या कामाची चौकशी करण्याची मागणीही संबंधीतांनी केली. काल गुडाळवाडी-करंजफेण दरम्यान दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली होती.

हेही वाचा: गडहिंग्लज: गौरी गणपती विसर्जनासाठी २२ कृत्रिम कुंड

दरड हटविण्याचे काम सुरू असतानाच पुन्हा दरड कोसळल्याने वाहतूक बंदच राहिली. आज सकाळपासून हे काम सुरू झाले खरे; परंतु दरडीशी संबंधीत जमीन मालक नामदेव पाटील व पांडुरंग पाटील या शेतकऱ्यांनी दरडीचे ढीग चुकीच्या पद्धतीने हटवून त्या माध्यमातून मुरूम काढून त्याची परस्पर विक्री केली जात असल्याचा आरोप करत हे काम काही काळ थांबवले व या कामाची चौकशी करण्याची मागणी केली.

हा मुरूम अन्यत्र न हलवता याच रस्त्याच्या माजबुतीकरणासाठी तो वापरण्याची मागणीही केली. दरम्यान, पंचायत समितीचे माजी सभापती दिलिप कांबळे यांनी मुरूम वाहून नेणारे ट्रॅक्टर नेमके कुणीकडे चाललेत याची चौकशी करण्याची मागणी केली.

Web Title: Farmers Suspect That The Crumbs Of The Collapsed Patient Are Being Sold

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Kolhapur