
भुईंज : परेल ते मलकापूर कोल्हापूरला जाणाऱ्या एसटी बसमधील प्रवासी महिलेच्या सोन्याच्या दागिन्यांवर शिरवळ येथे बसलेल्या अज्ञात चार ते पाच चोरट्या महिलांनी चिल्लर टाकून डल्ला मारला. याबाबत साडेसहा लाखांचा ऐवज चोरीला गेल्याची तक्रार जुबेरा आब्बास रमदूल (रा. साखरप्पा, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) यांनी भुईंज पोलिसात दिली आहे.