esakal | Video : एसटी, रेल्वेसाठी "वंचित'ने वाजवली डफली, लॉकडाउन उठवाची घोषणाबाजी
sakal

बोलून बातमी शोधा

Video : एसटी, रेल्वेसाठी "वंचित'ने वाजवली डफली, लॉकडाउन उठवाची घोषणाबाजी

सर्वसामान्य जनतेला रोजगारासाठी सुलभपणे प्रवास करता येणार आहे. या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन केले जाईल, असेही निवेदनात म्हटले आहे.

Video : एसटी, रेल्वेसाठी "वंचित'ने वाजवली डफली, लॉकडाउन उठवाची घोषणाबाजी

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : राज्य शासनाने एसटी बस सेवा सुरू करावी, केंद्राने रेल्वे वाहतूक सुरू करावी, दोन्ही सरकारने लॉकडाउन उठवावे, अशी घोषणाबाजी करत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू करावी, या मागणीसाठी आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने येथील मध्यवर्ती बस स्थानकासमोर डफली बजाव आंदोलन केले.
जिलेबीचा गोडवा, कोरोनामुळे कडवा... 
 
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेल्या भूमिकेनुसार "वंचित"चे सातारा जिल्हा समन्वयक चंद्रकांत खंडाईत यांच्या अध्यक्षतेखाली आज आंदोलन झाले. या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी एसटी बस सुरू करा.., रेल्वे वाहतूक सुरू करा, दोन्ही सरकारने लॉकडाउन उठवावे, अशी घोषणाबाजी करण्यात आली.

सर्वात मोठी राजकीय बातमी : शरद पवारांच्या भेटीसाठी अजितदादा 'सिल्व्हर ओक'वर
 
यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनात वंचित बहुजन आघाडीने म्हटले, की केंद्र व राज्य सरकारने लॉकडाउनचा मार्ग रद्द करून राज्यातील एसटी बस व शहरांतर्गत बस सेवा आणि सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू करावी. राज्यात एसटी सेवा बंद असल्याने कामगारांची उपासमार होत आहे, तर दुसरीकडे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अद्यापही बंद आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहे. त्यामुळे बससेवा तत्काळ सुरू करण्यात यावी. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला रोजगारासाठी सुलभपणे प्रवास करता येणार आहे. या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन केले जाईल, असेही निवेदनात म्हटले आहे.

 ठाकरे सरकार : लग्नाला परवानगी; धार्मिक कार्यक्रमांना का नाही? ज्येष्ठ किर्तनकार उवाच 

या आंदोलनात बाळकृष्ण देसाई, सुनील त्रिंबके, संदीप कांबळे, नीलेश लाड, दादासाहेब केंगार, डी. बी. जाधव, सुधाकर काकडे, शशिकांत खरात, सुनीता वाघमारे, कल्पना कांबळे, आबा दणाणे, ऍड. मिलिंद पवार, गणेश कारंडे, सत्यवान कांबळे, सतीश गायकवाड आदी सहभागी झाले होते.

Edited By : Siddharth Latkar

loading image